हवाला एजंटची होणार चौकशी, टोरेस फसवणूक प्रकरण
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील कोटय़वधी रुपये हवालामार्फत देशाबाहेर पाठविण्यात आल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पोलीस त्या हवाला एजंटची चौकशी करून गुह्यांची सखोल माहिती जाणून घेणार आहेत.
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 24 कोटी 49 लाखांची मालमत्ता हस्तगत केली आहे. त्यात पाच कोटी 98 लाखांची रोकड, बँक खात्यात गोठवलेली 15 कोटी 81 लाखांची रोकड, दोन कोटी 70 लाखांचे सोने व चांदीचा समावेश आहे. अजूनही गुंतवणूकदार पुढे असून गुंतवणूकदार व त्यांची फसवणूक झाल्याचा आकडा वाढत आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत तीन हजार 711 अर्ज दाखल झाले असून फसवणुकीचा आकडा 57 कोटी 56 लाखांवर आकडा गेला आहे. आज आणखी गुंतवणूकदारांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच कांदिवली येथील दोन तिजोऱया आजही न खोलल्याने त्यात नेमके काय घबाड आहे ते समजू शकले नाही.
दरम्यान, या फसवणूक प्रकरणातील पैसा हवालामार्फत देशाबाहेर गेला आहे. यासंबंधातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार पोलीस आता हवाला एजंटची चौकशी करून अधिकची माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List