पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स; ‘कुणीही उठून स्त्रियांच्या चारित्र्यावर..’

पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स; ‘कुणीही उठून स्त्रियांच्या चारित्र्यावर..’

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप नेते आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतली. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांची नावं त्यांनी घेतली. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपापसांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, असं तिने म्हटलंय. त्याचसोबत धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशीही मागणी प्राजक्ताने केली. या पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ताच्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट करत काहींनी तिला पाठिंबा दर्शविला आहे.

प्राजक्ता ताई, तुझी पत्रकार परिषद पाहिली. एवढं सगळं होऊन पण ज्या संयमाने, धैर्याने तू सगळं घेतलंस आणि बोललीस, त्यासाठी तुझा अभिमान वाटतो. तू बोललीस ते अगदी बरोबर आहे. असा काहीतरी कायदा झाला पाहिजे, कुणीही उठून स्त्रियांच्या चारित्र्यावर बोलायची हिंमत पुन्हा कुणाची होता कामा नये. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,’ असं एकाने लिहिलंय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी कलाकारांचे नाव घेतले जात आहेत, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तू हिंमत नको हारू’, असं म्हणत नेटकऱ्यांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे.

शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता म्हणाली, “सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण मी शांत होते म्हणजे या सगळ्याला माझी मूकसंमती नाहीये. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढवलं आहे.”

“तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता? असा संतप्त सवाल प्राजक्ताने विचारला. ती म्हणाली ” अतिशय कुत्सितपणे त्यांनी ही टिप्पणी केली. परळीला पुरूष कलाकार गेले नाहीत का? एका फोटोच्या आधारे तुम्ही कोणासोबतही नाव जोडणार का? वैयक्तिक स्वार्थासाठी अभिनेत्रींची नावं घेतली जातात,” असा आरोप प्राजक्ताने धस यांच्यावर केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तारक मेहता..’मधील भिडे मास्तरांच्या लेकीने बांधली लग्नगाठ; पहा व्हिडीओ ‘तारक मेहता..’मधील भिडे मास्तरांच्या लेकीने बांधली लग्नगाठ; पहा व्हिडीओ
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत भिडे मास्तरांची लेक सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली...
मिरजेतील ‘हिंद एज्युकेशन’च्या शिक्षकासह लिपिकाला अटक; पगाराची रक्कम मंजूर करण्यासाठी लाखाची मागणी
Pune crime news – पुरोगामी पुण्यात भोंदूंची ‘बाबागिरी’, चाकूच्या धाकाने बलात्कार
शिक्षण विभागाचा अजब कारभार, वर्ष संपत आले तरी दुसरा गणवेश मिळालाच नाही; सांगलीत 1 लाख 16 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित
Satara crime news – औंधच्या युवकाचा गोपूजमध्ये खून; 12 तासात दोन आरोपी जेरबंद
New Year 2025: रोहित शर्मापासून जसप्रीत बुमरापर्यंत सर्वांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
पाटबंधारे विभागाचा अजब कारभार, कर्जतच्या पाली भूतवली धरणाचे पाणी शेतकऱ्यांना नाकारले