महाराष्ट्रात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार

महाराष्ट्रात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार

महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिह्यांसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल. यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यामध्ये  यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाडय़ात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल, मात्र खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.

शेतकऱयांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱयापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीज प्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

30 डिसेंबरपासून थंडीत वाढ

29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पाहायला मिळेल आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माझ्या हत्येच्या कटाची पोलिसांना आधीच माहिती होती’, आमदार किणीकरांचा गौप्यस्फोट ‘माझ्या हत्येच्या कटाची पोलिसांना आधीच माहिती होती’, आमदार किणीकरांचा गौप्यस्फोट
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे...
Mumbai AQI Today : असं काय घडलं? मुंबई पाकिस्तानपेक्षा मागे का?
अभिनेत्रीचे प्रपोजल नाकारलं म्हणून वरुण धवनने खाल्ला मार; स्वत:च सांगितला तो किस्सा
प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंगची आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
थर्ड क्लास लोक… लाज आणली.. कुत्र्याच्या पिल्लावर सलग तीन दिवस…; अखेर अभिनेत्रीने वाचवला जीव अन्…
तुम्हालाही प्रवासात उलट्या, चक्कर येते ? मग हे उपाय कराच राव!
तुमच्या स्वयंपाकघरातील गूळ शुद्ध की भेसळयुक्त? ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो