Melbourne Test: क्रिकेटच्या मैदानातही पोहोचले खलिस्तान समर्थक; स्टेडियम बाहेर राडा
गेल्या काही वर्षात खलिस्तानचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरत असून खलिस्तान समर्थक आता उघडपणे समोर येऊ लागले आहे. खलिस्तानी दहशतवाद मोठ्याप्रमाणात पसरू लागल्याने हिंदुस्थानसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ लागले आहे. अशातच खलिस्तानी समर्थक क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान, खलिस्तान समर्थक आणि हिंदुस्थानी चाहते भिडल्याचं वृत्त आहे. खलिस्तान समर्थकांकडे तिकीटे नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही हिंदुस्थानी चाहत्यांकडे देखील तिकीटे नव्हती याच दरम्यान त्यांच्यात खटके उडाल्याची घटना समोर आली आहे. खलिस्तान समर्थक गटाने झेंडे फडकवले आणि हिंदुस्थानविरोधी घोषणा दिल्या, त्यामुळे हिंदुस्थानी चाहत्यांनी त्यांना विरोध केला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना कारवाई करावी लागली. व्हिक्टोरिया पोलिसांनी परिस्थिती प्रयत्नपूर्वक चिघळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि खेळादरम्यान व्यत्यय व्यत्यय आणणाऱ्या लोकांना तात्काळ पिटाळून लावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List