ईव्हीएम हटाव.. बॅलेटपेपर लाव ! मारकडवाडी, झापनंतर आता टिवरी

ईव्हीएम हटाव.. बॅलेटपेपर लाव ! मारकडवाडी, झापनंतर आता टिवरी

 ईव्हीएमच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीवासीयांनी काही दिवसांपूर्वी मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर सर्वत्र उद्रेक निर्माण झाला. ईव्हीएम नकोच अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायतीनेदेखील जोरदार ‘थप्पड’ लगावत बॅलेटवरच पुढील निवडणुका घ्या, अशी भूमिका घेतली. आता वसईतील टिवरी ग्रामपंचायतीनेही ईव्हीएम मशीनच्या विरोधात दंड थोपटले आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीची निवडणूक ईव्हीएम मशीन नव्हे तर बॅलेट पेपरवरच घेऊ, असा एकमुखी ठराव मंजूर केला आहे. असा निर्णय घेणारी टिवरी ही पालघर जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे.

टिवरी ग्रामपंचायतीची शुक्रवारी झालेली ग्रामसभा महत्त्वाची ठरली आहे. या सभेचे अध्यक्षपद उपसरपंच नूतनकुमार भोईर यांनी भूषवले तर माजी उपसरपंच नंदकुमार चौधरी हे या ठरावाचे सूचक होते. ग्रामस्थांनी एकमताने ईव्हीएम हटावचा नारा दिला आणि बॅलेटपेपरच्या माध्यमातूनच मतदान घेण्याचे ठरवले. या ऐतिहासिक ठरावाला गावचे पोलीस पाटील अजित भोईर यांनीही अनुमोदन दिले आहे. पालघर जिल्ह्यात हा दुसरा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

टिवरी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय पालघर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा देईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हाभरात त्यावर चर्चा सुरू झाली असून इतर गावांनीही असाच निर्णय घ्यावा, असा विचार केला जात आहे. ग्रामस्थांचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीसाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे, असे म्हटले आहे.

संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक

पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी बॅलेटपेपरची मागणी हे नागरिकांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. ग्रामसभेतील निर्णयामुळे टिवरी ग्रामपंचायत फक्त वसई किंवा पालघर जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी एक मार्गदर्शक ठरू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास...
भरकटलेल्या तरुणाची केली सुखरूप घरवापसी, सिक्युर कंपनीच्या स्टाफची कौतुकास्पद कामगिरी
बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर फेकली अंडी
राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार 54 वर्षीय नराधमाला अटक
‘आंबेडकरी आई’ ग्रंथाचे शनिवारी दादरमध्ये प्रकाशन
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार ; देश-विदेशातून अनुयायी
नवे सरकार येताच मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन पुन्हा चर्चेत