मागणीमुळे यंदा आंबेमोहोर तांदूळ महाग; देशासह परदेशातून मागणीमुळे हंगामाच्या सुरुवातीस दरवाढ

मागणीमुळे यंदा आंबेमोहोर तांदूळ महाग; देशासह परदेशातून मागणीमुळे हंगामाच्या सुरुवातीस दरवाढ

केंद्र सरकारने नॉन बासमती तांदळावरची उठवलेली निर्यात बंदी आणि निर्यात कर कमी केल्यामुळे आंबेमोहोर तांदळाला परदेशातून मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच आंबेमोहोर तांदळाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्यावर्षी सीझनच्या सुरुवातीला हे दर 7000 ते 7500 निघाले होते. यंदा घाऊक बाजारात प्रतिक्विंटलचे भाव 8000 ते 9000 रुपयांवर पोहोचले आहेत. सुमारे 500 ते 1000 रुपये प्रतिक्विंटलने आंबेमोहोर तांदळाची भाववाढ झाली आहे. त्यामुळे चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुगंधी आंबेमोहोर तांदूळ यंदा महागला आहे.

सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. विशेषतः पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ 10 ते 15 रुपये प्रतिकिलो महाग खरेदी करावा लागणार आहे. वर्षभर वापरल्या जाणाऱ्या वासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळापैकी आंबेमोहोरला चांगली मागणी आहे. यावर्षी बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोर तांदळाचे दर पोहोचतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचे दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी असल्याचा अंदाज जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी वर्तविला.

आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. महाराष्ट्रात कामशेत, भोर या भागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते; परंतु हा तांदूळ पिकणाऱ्या पुणे, मावळ, भोर, कामशेत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनींना चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून आंबेमोहोर महाराष्ट्रातून कमी होत चालला असल्याचे निरीक्षण तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी नोंदवले.

महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी 80 टक्के तांदूळ हा मध्य प्रदेशातून, तर उर्वरित 20 टक्के तांदूळ आंध्र प्रदेशातून होत आहे. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी जागेवरच अधिक प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे भाववाढ झालेली आहे.

धवल शहा, जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार, पुणे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशाच्या अर्थ व्यवस्थेला दिली नवीन दिशा, दोनदा पंतप्रधान; जाणून घ्या ‘मनमोहन सिंग’ यांचा जीवनप्रवास देशाच्या अर्थ व्यवस्थेला दिली नवीन दिशा, दोनदा पंतप्रधान; जाणून घ्या ‘मनमोहन सिंग’ यांचा जीवनप्रवास
देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत…
अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात, सौरव गांगुलीशी अफेअर; अन् अचानक बॉलिवूडमधून ही अभिनेत्री गायब
सलमान खानने सर्वांसमोर स्वत:ला चाबकाचे फटके मारले; सेटवरील सगळे पाहतच बसले
काँग्रेस ‘संविधान बचाओ पद यात्रा’ काढणार, CWC च्या बैठकीत कोणते प्रस्ताव झाले मंजूर? जाणून घ्या
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल