Border Gavaskar Trophy – ‘मोहम्मद सिराजला आवर घाला…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने निशाणा साधला
एडलेड येथे पार पडलेल्या पिंक बॉल कसोटीमध्ये टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरल्याने संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रिलियाने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरो साधली. या सामन्या दरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यात जोरदार वाद झाला होता. यावरून ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी मोहम्मद सिराजच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर याने 9News या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहम्मद सिराजच्या आक्रमकतेवर टीका केली आहे. तो म्हणाला की, मोहम्मद सिराजशी संघातील वरिष्ठांनी बोललं पाहिजे. ट्रॅव्हीस हेडच्या संदर्भात नाही तर, जेव्हा त्याला वाटते की त्याने फलंदाजाला बाद केले, तेव्हा तो पंचांचा निर्णय जाणून न घेताच जल्लोष करायला सुरुवात करतो. मला वाटत की हे त्याच्यासाठी आणि त्याच्या खेळासाठी चांगले नाही, असा सल्ला त्यांनी सिराजला दिला आहे.
मला त्याचा जोश, स्पर्धात्मक स्वभाव आवडतो. तसेची ही वस्तुस्थिती आहे की एक चांगली मालिका सध्या सुरू आहे. परंतु खेळाचा आदर कायम राखला पाहिजे. मला वाटतं की त्याने वरिष्ठांशी बोलल्यानंतर या गोष्टी समजण्यास त्याला मदत होईल, असेही मार्क टेलर म्हणाला आहे.
एडलेड कसोटीतील पहिल्या डावातील 82व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडची दांडी उडवत त्याला क्लिन बोल्ड केले होते. विकेट घेतल्यानंर सिराजने प्रेक्षकांकडे बोट दाखवत जोरदार सेलिब्रेशन केले. हेडला ही कृती आवडली नाही. त्यामुळे तो सिराजला काही तरी बोलला. यावरुन जोरदार वाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनही या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केली आहे. दोन्ही खेळाडूंना 1-1 टिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. तसेच मोहम्मद सिराजवर सामन्यातील 20 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List