कर्जाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
कर्जबाजारीपणाला पंटाळून सिन्नर तालुक्यातील फरदापूर येथे शेतकरी दाम्पत्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर अशोक बोराडे (35) हा अल्पभूधारक शेतकरी असून, पशुपालनाचा व्यवसाय करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने आपल्या पाचवर्षीय मुलीला मेहुणीकडे पाठवले. रविवारी सकाळी फरदापूर-भोकणी फाटा रस्त्यावरील विहिरीच्या कठडय़ावर त्याच्यासह पत्नी दिपाली (30) हिच्या चपला आढळल्या. ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी नातेवाईक प्रमोद बोराडे यांनी दिलेल्या माहितीवरून वावी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. त्याने मृत्यूपूर्वी वडिलांना उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत मुलीचा सांभाळ करून आपल्या वाटय़ाची जमीन तिच्या नावावर करण्याबाबत, तसेच दोन मेहुण्यांना मुलीला सांभाळण्याबाबतचा मजकूर लिहिला आहे. त्याच्यावर चार ते पाच लाखांचे कर्ज असल्याचे मित्रांचे म्हणणे असल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List