Pune accident …तर कदाचित आजची दुर्घटना घडली नसती! रोहित पवार यांनी व्यक्त केला संताप
मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथ वर झोपलेल्या 9 जणांच्या अंगावर डंपर चढविल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 1 वाजता वाघोली पोलीस चौकीजवळ घडली आहे. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अंगावर काटा आणण्याऱ्या या घटनेनेची सकाळी सकाळी बातमी पाहून मन सुन्न झाले आहे. ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला केला आहे.
तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही.. असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2024
रोहित पवार यां0नी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरून पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले की, तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही. असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं. यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरूय.. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का? सकाळी सकाळी ही बातमी पाहून मन सुन्न झालं.. ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही? यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले कामगार लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना! सरकारने पीडित कुटुंबांना योग्य भरपाई द्यावी’, ही मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List