ठाण्यात वायू प्रदूषण वाढले, घोडबंदरवासीयांची ‘धूळ’धाण; रहिवाशांचा श्वास घुसमटला

ठाण्यात वायू प्रदूषण वाढले, घोडबंदरवासीयांची ‘धूळ’धाण; रहिवाशांचा श्वास घुसमटला

मुंबईच्या पाठोपाठ ठाणे शहरातील हवादेखील बिघडल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 183 नोंद झाला आहे. विशेष म्हणजे घोडबंदर भागातील हवा सर्वात जास्त खराब आहे. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या तसेच नियम धाब्यावर बसवून इमारतींचे बांधकाम केले जात असल्याने धुळीचे अक्षरशः लोट उठत आहेत. त्यामुळे घोडबंदरवासीयांची ‘धूळ’ धाण झाली असून रहिवाशांचा श्वास घुसमटला आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स डिसेंबर महिन्यात खालावत चालली असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक, पंधरवड्यानंतर 183 एवढा नोंदवण्यात आला आहे. हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावली आहे. घोडबंदरच्या हवेची गुणवत्ता 190 वर पोहोचली आहे तर उपवन परिसरात 176 एवढी गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे.

ठाणे हे तलावांचे शहर असून शहरात वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे तसेच विविध विकासकामांमुळे आणि धूळ, धुराच्या व्याप्तीने शहरात वायू प्रदुषणाची पातळी काही अंशी वाढली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या दोन वषपिक्षा तुलनेने कमी आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 183 पर्यंत पोहोचला असल्याने सध्या तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे.
– मनीषा प्रधान, मुख्य पर्यावरण अधिकारी,

गुणवत्ता कशी मोजतात?

एअर क्वालिटी इंडेक्सनुसार 0 ते 50 एअर क्वालिटी इंडेक्सची नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो. 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम गुणवत्ता, 201- 300 प्रदूषित, 301 ते 400 अत्यंत प्रदूषित आणि 401-500 गंभीर स्वरुपाचे प्रदूषण मानले जाते.

प्रदूषण रोखण्याचे महापालिकेसमोर मोठे आव्हान

शहरात सर्वत्र हवेत धुळीचे प्रमाण बाढले असून हवेतील प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिकेसमोर आहे. दरम्यान मुंबई ठाण्यापेक्षा पुणे, चिंचवड, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, अहिल्यानगर आदी शहरांतील हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये असल्याने श्वास घेण्यासही त्रासदायक असल्याचे अहवालात नमूद आहे.

तक्रारीसाठी पालिकेची हेल्पलाइन

ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्याचसोबत हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन (8657887101) सुरू केली आहे. हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सअॅप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय
Maratha Kranti Morcha: बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात अनेक पावले उचलली...
भुजबळ फडणवीसांना का भेटले? भाजपच्या बड्या नेत्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर
अल्लू अर्जुनकडे आहेत ‘या’ 5 महागड्या गोष्टी; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
चिंता वाढली… भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमी, कारणे काय?; उपाय काय?
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
हिवाळ्यात दररोज किती बदामाचे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
महिनाभरात सेवा सुधारा अन्यथा 26 जानेवारीला “टॉवरवरून” आंदोलन, युवासेनेचा BSNL ला इशारा