संभलमध्ये सापडली 150 वर्षे जुनी विहीर; बाके बिहारी मंदिर आढळल्यानंतर खोदकामाला वेग
संभलच्या चंदोसी शहरातील लक्ष्मणगंज येथील प्राचीन विहिरीचे खोदकाम आज सकाळी पुन्हा सुरू झाले. ही तब्बल 150 जुनी विहीर असून ती बाके बिहारी मंदिराशी जोडलेली आहे. 2 जेसीबी आणि 30 मजूर खोदकाम करत असून 6 ते 7 फूट खोल आणि 8 ते 10 मीटर लांबी असलेली ही विहीर असल्याचे चित्र खोदकामादरम्यान समोर आले. दरम्यान, 17 डिसेंबर रोजी लक्ष्मणगंजमध्ये बाके बिहारी मंदिराचे अवशेष सापडले होते.
जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेंद्र पानसिया आणि पोलीस अधीक्षक कृष्णा बिष्णोई यांनी बावडीचा नकाशा तपासला आणि सध्या येथील 210 चौरस मीटर परिसरात लोकांनी केलेले अतिक्रमण आता काढले जाणार आहे. सापडलेली विहीर आणि बाके बिहारी मंदिर 150 वर्षे जुने असल्याचे ते म्हणाले. 17 डिसेंबर रोजी मंदिराचे अवशेष आढळल्यानंतर 21 डिसेंबर रोजी या परिसरातील विहिरीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार करण्यात आली. नगर परिषद चांदोसी यांना जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवताना जेसीबी आणि मजूर रात्रीपर्यंत खोदकाम करत असताना एक बोगदा आढळून आला. त्यानंतर विहिरीचे चित्र समोर आले.
पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण
पुरातत्व विभागाच्या पथकाने शनिवारी संभलच्या कल्की मंदिराची पाहणी केली. या पथकाने मंदिराचा घुमट, भिंतीवर केलेले कोरीव काम आणि संकुलाची छायाचित्रे तसेच व्हिडीओ काढले. यासोबतच कॅम्पसमध्ये असलेल्या कृष्णा विहिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. दोन दिवसांपासून खोदकाम सुरू असल्याचे पालिकेने म्हटले आहे. बोगदा आणि इमारतीची माहिती मिळताच उत्खनन करण्यासाठी आणखी पथके तैनात केली जात आहेत. इथे एक राज्य होते. हे संस्थानाचे पोर्टल होते आता ते निदर्शनास आले तर ते काय आहे आणि कसे आहे हेदेखील लवकरच समोर येईल असेही सांगितले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List