कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला चोपले; दोघांविरोधात गुन्हा
कल्याण पश्चिमेतील भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बेदम चोपल्याची घटना घडली. तू लय माजला आहेस का, आमच्या दादाला शिव्या देतो असे म्हणत हल्लेखोरांनी मारहाण केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हा दादा नेमका कोण, अशी चर्चा कल्याणमध्ये सुरू आहे.
हेमंत परांजपे हे एका लग्न समारंभावरून घरी जात होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास घराजवळ उभे असताना दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. तू लय माजला आहेस का, आमच्या दादाला शिव्या देतो, काहीपण बोलतो का, असे म्हणत दोघांनी हेमंत यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पेव्हर ब्लॉक पायावर टाकून त्यांना जखमी केले. हेमंत यांनी वाचवा वाचवा असा आरडाओरडा करताच नागरिक धावून आले. यावेळी दोघांनी दुचाकीवरून पळ काढला. हेमंत यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List