धर्म प्रचारकाला धमकी, विलेपार्ले पोलिसांनी केला गुन्हा दाखल
श्री कृष्ण जन्मभूमी मुक्त निर्माण ट्रस्ट मथुराच्या अध्यक्षाला विमान प्रवासा दरम्यान धमक्या आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
तक्रारदार हे उत्तर प्रदेश येथे राहत असून ते श्री कृष्ण जन्मभूमी मुक्त निर्माण ट्रस्ट मथुराचे अध्यक्ष आहेत. मथुरा मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी येथील 13. 7 एकर जागा ही श्री कृष्ण मंदिराच्या मालकीची आहे. त्या पैकी 2. 57 एकर जागा ही ट्रस्टच्या ताब्यात असून साई मस्जिद ईदगाह यांनी अवैध रित्या ताब्यात ठेवली आहे. त्या विरोधात मथुरा येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. युक्तिवाद सुरु झाल्यानंतर जानेवारी पासून तक्रारदार याना पाकिस्तानातून धमक्या येत आहेत.
शनिवारी तक्रारदार हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले. तेव्हा त्याना एका नंबरवरून फोन आला. पह्न करणाऱयाने त्याना तुम्ही मुंबईला पोहचत आहेत, तुमच्या यात्रेला बॉम्ब ने उडवू, यात्रा बंद करा अशी धमकी दिली. त्यानंतर तक्रारदार हे मुंबईत आले. ते विलेपार्ले येथील एका ठिकाणी असताना त्याना पुन्हा पह्न आला. त्याने शिवीगाळ करून यात्रा दरम्यान वर पोहचवू अशी धमकी दिली. धमकी दिल्यानंतर तक्रारदार हे विलेपार्ले पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List