पालघरमध्ये आदिवासी मातांवर मृत्यूचा फेरा, अकरा वर्षात 155 महिला दगावल्या
पालघर जिल्ह्यात बालमृत्यूपाठोपाठ आता मातामृत्यूच्या आकड्यातही लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. 2014 पासून ते आतापर्यंत तब्बल 155 मातांचा मृत्यू झाला आहे. या वर्षात पालघर जिल्ह्यात वीस मातांचा मृत्यू झाला होता. मातामृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पालघर तालुक्यात असून त्या खालोखाल डहाणू, जव्हार व विक्रमगड तालुक्यात महिला दगावल्या आहेत. मुदतपूर्व प्रसूती, कमी वयात विवाह, शारीरिक समस्या यासह गर्भधारणेच्या समस्या त्यातच योग्य तो पोषण आहार न मिळाल्यामुळेही मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे उघड झाले आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालविवाहसारख्या अनिष्ट रुढी परंपरा आजही कायम आहेत. अशा प्रकारांमुळे लहानपणीच शारीरिक अडचणी निर्माण झाल्याने स्तनदा व गर्भवती मातांचे मृत्यू होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. अनेक उपाययोजना केल्यानंतरही ग्रामीण दुर्गम भागात बालविवाह होत आहेत. मातामृत्यू होऊ नये यासाठी महिला बालकल्याण विभागामार्फत सकस आहार, एपीजे अब्दुल कलाम आहार योजना अशा अनेक विविध योजना राबवल्या जातात. त्यानंतरही मातामृत्यू कायम आहे. 2024 मध्ये ऑक्टोबरपर्यंत तब्बल 10 मातांचे मृत्यू झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List