कल्याणमध्ये तृतीयपंथीयांसाठी उभे राहणार हक्काचे मार्केट, पालिका देणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण
तृतीयपंथी समुदाय हा समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटक समजला जातो. या समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने विशेष योजना आखली आहे. तृतीयपंथीयांसाठी बचत गट तयार करून त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या उपजीविकेसाठी मार्केटही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता विविध उपक्रम राबवून तृतीयपंथीय समुदायाला समाजात सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सहाय्य देण्यात येणार असून तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथी समाज आहे. त्यांनी यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले कर्तव्य बजावले आहे. महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली
लवकरच पुढील धोरण
महापालिकेच्या या उपक्रमांबाबत तृतीयपंथीय समुदायाने समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी महापालिकेशी सविस्तर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच तृतीयपंथी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक आयोजित करून पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे.
समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी नुकतीच शहरातील अस्मिता किन्नर संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर तृतीयपंथी नीता केणे यांच्यासह सविस्तर चर्चा करून येत्या काळात उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त जाखड यांनी दिले.
किन्नर महोत्सव आयोजित केला जाणार आहे. तसेच बचत गट तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांच्या उपजीविकेसाठी मार्केट उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय विविध उपक्रमांत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचा विचार पालिका करणार आहे. – संजय जाधव (पालिका उपायुक्त)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List