नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन; तब लढे तो गोरोसे, अब लडेंगे भाजप के गुंडोसे
मुंबई येथील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘भक्त गुंडा पार्टी’ असे फलक घेऊन विधिमंडळ परिसरात आंदोलन केले. यावेळी ‘तब लढे तो गोरोसे, अब लडेंगे भाजपके गुंडो से’, ‘भाजप गुंडांचा पक्ष, फोडाफोडी हेच लक्ष्य’ अशा घोषणांनी सर्व आमदारांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला. आंदोलनामध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनिल चौधरी, भाई जगताप, रोहित पवार, अमीन पटेल, डॉ. प्रज्ञा सातव, विकास ठाकरे, नितीन राऊत आदींचा सहभाग होता. दरम्यान, काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांच्या आसनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावले. त्यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरू झाल्या आणि गदारोळ झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List