सर्वात मोठी बातमी ! भर समुद्रात थरार… बोटीचे दोन तुकडे, जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवले; चालकाचे आरोप काय?
मुंबईतील गेटवेहून एलिफंटा येथे प्रवाशांना घेऊन निघालेली प्रवासी बोट उरण कारंजा येथे समुद्रात बुडाल्याची घटना घडल्यानंतर आता या बोटीचे चालकाने या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने ती बुडाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. एलिफंटा येथे दुपारी अडीच नंतर आमची नीलकमल बोट निघाली असता तिला बुचर आयलँड येथे नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचा आरोप शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
राजेंद्र परते काय म्हणाले
या संदर्भात नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी माहिती देताना सांगितले की आमची रोज अडीच वाजता एलिफंटाला जाते. आजही जात होतो. तिकडे नेव्हीची स्पीड बोट आहे. या बोटीने राऊंड मारला. नागमोडी होऊन गेली. आणि तिने आमच्या बोटीला जोराने धडक दिली. त्यामुळे अपघात झाला. नेव्हीची स्पीड बोट होती. एकूण ८० प्रवासी बोटीत होते. किती जणांना बाहेर काढलं माहीत नाही. ५६ लोक जेएनपीटीत आहे. काही नेव्हीच्या बोटीने गेले. काही गेटवेच्या बोटीने आणले आहेत असे बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असून बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
बचावकार्याला वेग
मुंबईत एलिफंटा परिसरात सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List