Cancer Vaccine – 2025 पासून मिळणार कर्करोगावर फ्री वॅक्सीन! रशियाचा मोठा दावा
जगभरात सध्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशातच कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला आहे. रशियाने कर्करोगाची लस तयार केली आहे. सर्व रुग्णांना ही लस मोफत मिळणार आहे. या लसीचा वापर हा ट्यूमरची वाढ होण्यापासून रोखण्यासाठी होऊ शकतो, असा दावा रशियाने केला आहे. संपूर्ण जग कर्करोगासारख्या गंभीर आजाराने हैराण झाले आहे. अशा परिस्थितीत रशियाने हा दावा केल्यामुळे जगभरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
रशियाचे आगोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी याबाबत माहिती दिली आहे. कर्करोगावर बनवण्यात येणारी लस 2025 च्या सुरुवातीला लाँच केली जाईल. तसेच रशियातील कर्करोगाच्या रुग्णांवर मोफत उपचारही केले जातील. रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर एंड्री काप्रिन यांनी देखील या लसीबद्दल माहिती दिली. दरम्यान ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचारासाठी तयार करण्यात आली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच या लसीला कोणतेही नाव देण्यात आलेले नाही.
रशियातही कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. 2022 मध्ये 6लाख 35 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे आता रशियाच्या या नव्या दाव्याने अनेक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List