उस्ताद झाकीर हुसेन आणि कर्जतचा तबला, ‘त्या’ मैफलीच्या आठवणी जागा झाल्या

उस्ताद झाकीर हुसेन आणि कर्जतचा तबला, ‘त्या’ मैफलीच्या आठवणी जागा झाल्या

■ अजय गायकवाड

आपल्या जादुई तबला वादनाने संपूर्ण जगाला भुरळ घालणारे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर आता विविध आठवणींनी ‘ताल’ धरला आहे. त्यांचे चाहते कर्जतमध्येदेखील होते. एका खासगी मैफलीसाठी ते काही वर्षांपूर्वी आले असताना तेथील स्थानिक कारागिराने बनवलेल्या तबल्याच्या हुसेन हे प्रेमातच पडले. त्यांना तो तबला एवढा आवडला की, परत जाताना सोबत तो तबला घेऊन गेले. कर्जतमधील रसिकांच्या मनात झाकीर हुसेन आणि त्या तबल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

कर्जतमधील संगीत रसिक रवी आरेकर व झाकीर हुसेन यांची चांगली मैत्री होती. काही वर्षांपूर्वी उस्ताद रवी आरेकर यांच्याकडे आले होते. तबल्याचा बादशहा आल्याचे वृत्त तबला कर्जतमधील चाहत्यांना समजताच सर्वांची पावले आरेकरांच्या घराकडे वळली. आज संध्याकाळी आपण मैफल करूया, अशी गळ आरेकरांनी घातली आणि झाकीरभाई तयार झाले. मग तबल्याची चाचपणी सुरू झाली. पण झाकीर यांना हवा तसा तबला नव्हता. त्यामुळे त्यांनी दुसरा तबला कुणाकडे मिळेल का, अशी विचारणा त्यांनी आरेकर यांच्याकडे केली. आरेकरांनी रात्रीच्या वेळी शोध घेण्यास सुरुवात केली. कर्जतमध्ये तबला बनवणारे विजय हरिश्चंद्रे यांचे घर आरेकर यांनी गाठले.

मी पैसे देतो.. पण तबला मला द्या!

हरिश्चंद्रे यांचे कर्जतमध्ये तालवाद्य बनवण्याचे दुकान होते. आरेकर यांनी झाकीर हुसेन यांच्यासाठी तबला मिळेल का, अशी विचारणी केली. त्यांनी लगेच एक चांगला तबला दिला. पण हा तबला विकला गेला असून मैफल संपल्यानंतर पुन्हा आणून द्या, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. झाकीरभाईंना तो तबला आवडला. तोच त्यांनी मैफलीत वाजवून रसिकांची मने जिंकली. तो तबला मला द्या, ज्याने तो विकत घेतला आहे त्याला मी पैसे देतो असेही सांगितले व तबला झाकीर हुसेन आपल्यासोबत घेऊन गेले.

‘ते’ बोल अजूनही घुमतायत

ज्यांनी हा तबला आधी विकत घेतला होता त्या रघुनाथ दगडे यांना ही बाब समजली तेव्हा त्यांनाही आनंद वाटला आणि आपली काही हरकत नाही असेही सांगितले. झाकीरभाईंच्या निधनानंतर कर्जतकरांच्या मनात उस्तादांनी वाजवलेल्या तबल्याचे बोल अजूनही घुमतच आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CM Devendra Fadnavis: देवाभाऊंचे अभिनंदन करण्याची स्पर्धा? सामनानंतर, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून कौतूक, महाराष्ट्रातील राजकारणात काय होणार? CM Devendra Fadnavis: देवाभाऊंचे अभिनंदन करण्याची स्पर्धा? सामनानंतर, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून कौतूक, महाराष्ट्रातील राजकारणात काय होणार?
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांपासून टोकाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले होते. परंतु आता राज्यातील राजकारण बदलण्याचे...
सेलिब्रिटी कसा वाढवतात पैसा? विवेक ओबेरॉयने सांगितल्या जबदस्त टिप्स; याच टिप्समुळे बनला 1200 कोटींचा मालक
अंड्याचा बलक की पांढरा भाग, केसांच्या वाढीसाठी काय फायदेशीर? जाणून घ्या
तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 30 जण जखमी
Latur News – 5 लाख 55 हजार रुपयांचा गुटखा जप्त
जम्मू कश्मीरच्या बंदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; 2 जवानांना वीरमरण, 5 जवान जखमी
HDFC बँक या बँकेतील मोठा समभाग खरेदी करणार; RBI ची मंजुरी, शेअर रॉकेट होण्याची शक्यता