आमिर खानच्या दुसऱ्या पत्नीला मोठा धक्का, किरण रावचं मोठं स्वप्न भंगलं
Laapataa Ladies Is Out Of Oscars 2025: 97 व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ‘ऑस्कर 2025’ साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली होती. पण आता सिनेमा या शर्यतीतून बाहेर झाला आहे. ज्यामुळे अभिनेता याची दुसरी पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव हिचं मोठं स्वप्न भंगलं आहे. आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ सिनेमा टॉप 15 मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करु शकला नाही. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने बुधवारी ही माहिती दिली. त्याचबरोबर ब्रिटीश-भारतीय दिग्दर्शिका संध्याचा ‘संतोष’ या सिनेमाने टॉप 15 मध्ये स्थान मिळवलं असून आता हा सिनेमा ब्रिटनच्या वतीने ऑस्करसाठी जाणार आहे.
‘लापता लेडीज’ हा सिनेमा ऑस्कर 2025 साठी परदेशी चित्रपट श्रेणीत पाठवण्यात आला होता. 23 सप्टेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली. पण ऑस्करच्या शर्यतीतून सिनेमा बाहेर आला आहे. सिनेमात रवी किशन, छाया कदम, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांटा आणि नितांशी गोयल यांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्कर नामांकनांची माहिती 17 जानेवारी रोजी समोर येईल. तर पुरस्कार सोहळा 2 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये विजेत्यांची घोषणा केली जाईल. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने, ज्यामध्ये 13 सदस्यीय ज्यूरीचा समावेश होता, भारताच्या वतीने ‘लापता लेडीज’ची ऑस्करसाठी निवड केली.
नामांकनाच्या शर्यतीत 29 सिनेमांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये ‘हनु-मान,’ ‘कल्कि 2898 एडी,’ ‘ॲनिमल,’ ‘चंदू चँपियन,’ ‘सॅम बहादुर,’ ‘स्वातंत्र्य वीर सावरकर,’ ‘गुड लक,’ ‘घरत गणपती,’ ‘मैदान,’ ‘जोरम,’ ‘कोट्टुकाली,’ ‘जामा,’ ‘आर्टिकल 370,’ ‘अट्टम,’ ‘आदुजीविथम’ आणि ‘ऑल वी इमेजिन ऐज लाइट’ हे सिनेमे सामिल होते.
पण जूरींनी ‘लापता लेडिज’ सिनेमाची निवड केली. कारण 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सिनेमाने नवीन विक्रम रचले. सिनेमाचे काही सीन आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सिनेमात किरण राव आणि आमिर खान यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ज्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य देखील केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List