750 रुपयांत लग्न; मनिषा कोईरालामुळे वेगळा राहण्याचा निर्णय; नाना पाटेकरांच्या पत्नीला पाहिलं का? ज्या आजही त्यांच्यासोबत राहत नाही
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना कोणत्या वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास ओळख आहे. त्यांची शैली, त्यांचा आवाज तसेच त्यांची डायलॉग म्हणण्याची पद्धत अगदी प्रसिद्ध आहेत. नानांनी हिंदी व मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केलं आहे.
नानांची आणि नीलकांती यांची भेट कशी झाली?
नानांच्या अभिनयासोबतच साधं राहणीमान, गावाची ओढ यासर्वांबद्दलच नेहमी चर्चा होताना दिसते. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र फारसं कोणाला माहित नाही किंवा त्याबद्दल तेवढी चर्चा केली जात नाही.
नाना पाटेकर यांच्या पत्नीचं नाव आहे नीलकांती. पण ते दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. घटस्फोट न घेता दोघेही वेगळे राहत आहेत. नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती आहे. या दोघांना मल्हार हा मुलगा आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून नाना आणि नीलकांती वेगळे राहतात. या दोघांची पहिली भेट थिएटरमध्ये काम करताना झाली होती.
अवघ्या 750 रुपयांत लग्न केलं होतं
नीलकांती देखील ऐकेकाळी अभिनेत्री होत्या. थिएटर करत असताना त्यांची आणि नानांची भेट झाली. त्यावेळी नीलकांती बँकेत अधिकारी होत्या आणि त्यांना 2500 रुपये महिना पगार मिळायचा. दुसरीकडे नाना पाटेकर एका शोमधून 50 रुपये कमावायचे.
प्रेमात पडल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा खर्च अवघा 750 रुपये झाला होता. अगदी साध्या पद्धतीने त्यांनी लग्न केलं होतं. तर ते दोघे हनिमूनसाठी पुण्याला गेले होते.
मोठ्या मुलाचं निधन
नीलकांती यांनाही अभिनयाची आवड होती. पण लग्नानंतर त्यांनी नोकरी चालू ठेवली. त्यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं. ‘आत्मविश्वास’ असं त्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता.
नीलकांती यांनी नाना पाटेकरांना अभिनयात करिअर करण्याठी पाठिंबा दिला. लग्नानंतर काही वर्षांनी नाना व नीलकांती आई-बाबा झाले. पण त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा असताना त्याचं निधन झालं. त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी मल्हार ठेवलं.
मनीषा कोईरालासोबत नाव जोडलं गेलं अन्…
मोठ्या मुलाच्या निधनाचा नाना पाटेकर यांना धक्का बसला होता. काही वर्षांनी पती-पत्नीमध्येही मतभेद सुरू झाले. रिपोर्ट्सनुसार काही वर्षांनी नाना पाटेकर यांचे नाव मनीषा कोईरालासोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा येऊ लागल्या होत्या. त्यानंतर नीलकांती आणि नाना यांच्यातील दुरावा वाढतच गेला. इतक्या वर्षांनंतरही नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी घटस्फोट न घेता वेगळेच राहत आहेत.
दरम्यान नाना पाटेकर आजही चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. एवढच नाही तर त्यांचा स्पष्टवक्तेपण आणि साध-सरळ राहणीमान याची आजही तेवढीच चर्चा केली जाते. तसेच त्यांच्या अनेक मुलाखतींमधून त्याच्या लहानपणापासूनचे किस्सेही आता ऐकायला मिळतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List