वाल्मिक कराडला अटक झालीच पाहिजे,संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करू – रोहित पवार
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी नेमून काही न्याय मिळणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. या प्रकरणात आपण कोणत्या मंत्र्याचं नाव घेत नाही तर खंडणी मागणाऱ्या आरोपी वाल्मिक कराडचे नाव घेत आहोत. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही हत्या झालीच नसती असा आरोप रोहित पवारांनी केला. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं गावकरी म्हणतात, त्याला अटक झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. तोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. रोहित पवार हे मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेले होते.
रोहित पवार म्हणाले की, संतोष देशमुख यांच्यासोबत अतिशय भीतीदायक आणि अमानवीय घटना 9 तारखेला घडली. या घटनेत अनेक मोठ्या लोकांचा हात आहे. हे सामान्य लोकांना देखील माहीत आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात पवनचक्की प्रकल्पाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात मास्टर माईंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे. त्याचे सर्व फोन कॉल्स तपासले पाहिजेत. संतोष देशमुख प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि त्याचा चौकशी अहवाल हा जनतेसमोर मांडण्यात यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि त्यांना न्याय… pic.twitter.com/b39n04ASD1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2024
निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची रोहित पवार यांनी भेट घेऊन विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू, अशा शब्दांत त्यांनी देशमुख कुटुंबियांना आश्वस्त केलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List