आमिर खानचं दुसऱ्या घटस्फोटानंतर मोठं वक्तव्य, ‘आम्ही आजही एकमेकांवर प्रेम करतो कारण…’
Aamir Khan on relationship with kiran Rao: अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांचा घटस्फोट झाला आहे. पण घटस्फोटानंतर देखील दोघांच्या मनात एकमेकांप्रती असलेलं प्रेम आणि आदर कायम आहे. दोघे कायम एकमेकांसोबत राहतात. आमिर आणि किरण यांचा ‘लापता लेडिज’ सिनेमा देखील घटस्फोटानंतर प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. सिनेमाला यश मिळाल्यानंतर आमिरने किरणचं कौतुक केलं. शिवाय आमिर स्वतःला भाग्यशाली समजतो कारण अभिनेत्याच्या आयुष्यात किरणची एन्ट्री झाली.
नुकतात झालेल्या मुलाखतीत आमिर खान याने दुसरी पत्नी किरण हिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. ‘मी भाग्याशाली आणि आभार व्यक्त करतो कारण किरण माझ्या आयुष्यात आली. आम्ही 16 वर्ष एकमेकांसोबत उत्तम वेळ व्यतीत केला. मी किरण कडून खूप काही शिकलो आहे. ती फक्त एक उत्तम व्यक्ती नाही तर, चांगली दिग्दर्शिका देखील आहे…’
‘लापता लेडिज’ सिनेमासाठी किरणची निवड का केली?
यावर आमिर म्हणाला, ‘जेव्हा मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा मझ्या समोर सर्वात आधी किरण आली. कारण ती एक सच्ची दिग्दर्शिका आहे. सिनेमाची स्क्रिप्ट देखील ड्रामेटिक होती. त्यामुळे दिग्दर्शक देखील असा हवा होता जो सत्याची बाजू मांडत कथेला न्याय देईल…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
एकमेकांवर आजही प्रेम करत – आमिर खान
किरण हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेता म्हणाला, ‘काहीही गुपित नाही. किरण उत्तम व्यक्ती आहे आणि मी जास्त वाईट नाही… आम्ही एकमेकांवर आजही प्रचंड प्रेम करतो. आमचं नातं काही प्रमाणात बदललं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की एकमेकांबद्दल आमचे विचार बदलले आहेत.’
पुढे अभिनेत्याला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. ‘सिनेमा तयार करताना कधी भांडणं झाली?’ यावर अभिनेता म्हणाला, ‘हो… भांडणं तर अनेकदा झाली… भांडणं केल्या शिवाय आम्ही सिनेमा तयार करुच शकत नाही… जेथे आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं असतं तिथे आम्ही आमचं म्हणणं मांडतो…’ असं देखील अभिनेता म्हणाला,
किरण राव आणि आमिर खान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाच्या 16 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला. दोघांना आझाद नावाचा एक मुलगा देखील आहे. घटस्फोट झाल्यानंतर देखील दोघे एकत्र मुलाचा सांभाळ करतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List