मला तुझं अपहरण करायचंय! उबेर चालकाने ग्राहकाला पाठवला विचित्र मेसेज
हरियाणाच्या गुडगावमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाला उबेर चालकाकडून थरकाप उडवणारा मेसेज आला आणि त्याने घाबरुन ती राइडच कॅन्सल केली. याबाबत रेडइट युजर कुशपायरो1 याने त्याचा भयंकर अनुभव r/gurgaon वर शेअर केला. शिवाय त्याला कॅब ड्रायव्हरने पाठवलेला धक्कादायक संदेशही पोस्ट केला.
कुशपायरोने रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी उबेर प्रायोरिटी सेडान कॅब बुक केली होती. युजर पुढे म्हणाला की, हे सर्व लिहीताना माझ्या अंगावर काटा येत आहे. माझी तासाभराने ट्रेन आहे, मी तिथे वेळेवर पोहोचतोय की नाही हेही माहित नाही. तो म्हणाला, त्याने रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली होती. त्यानंतर गाडी येण्याच्या काहीवेळापूर्वी एकदा ओटीपी पाहण्यासाठी मोबाईल पाहिला तर त्याला धक्काच बसला. उबेरच्या चॅटमध्ये चालकाचा विचित्र मेसेज होता. या तरुणाने पोस्ट शेअर करताना त्या मेसेजचा स्क्रिनशॉटही सोबत जोडला. त्यात तरुणाने प्लीज कम असा मेसेज लिहीला. त्यानंतर चालकाचा मेसेज आला आनंद विहार येथे जा, मला तुमचे अपहरण करायचे आहे. मध्य रात्री असा मेसेज पाहिल्यावर तो प्रचंड घाबरला.
‘मला माहित नाही की माझ्यामध्ये काय आवेग आला मी कॅब रद्द करण्याचा विचार केला, जेव्हा मी कॅब रद्द करू लागलो तेव्हा त्याने लगेच स्वतःच रद्द केले आणि मी माझ्या सामानासह घराकडे पळत सुटलो, ते रद्द होण्याच्या काही क्षण आधी मी एसएस घेतली,’ असे लिहिले. या घटनेने अनेकांना धक्का दिला असताना, काही वापरकर्त्यांनी त्वरीत निदर्शनास आणले की संदेश दिसतो तितका भयंकर असू शकत नाही. ऑटो करेक्ट चुकीचे झाले असे दिसते. पण चांगली गोष्ट आहे की तुम्ही दुसरी कॅब घेतली. हे विचित्र होते,” वापरकर्त्याने लिहिले, तर दुसऱ्याने जोडले, “भाषांतराची चूक किंवा ऑटोकरेक्ट असे वाटते. कारण या वाक्याचा काही अर्थ वाटत नाही. तरुण म्हणाला की, त्याने या मुद्द्याला उबेर रिस्प्ॉम्स टीमकडे पाठवले. त्यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे राईड स्विकारणे आणि पाहण्यासाठी अनिश्चित काळासाठी बंदी घातल्याचे सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List