आळंदीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 66 जणांना चावा

आळंदीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 66 जणांना चावा

आळंदी येथील भागीरथी नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, चिमुरड्यांपासून ज्येष्ठांपर्यंत तब्बल 66 जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. 66 जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऊर्मिला शिंदे यांनी दिली.

घाणीचे साम्राज्य असलेल्या भागीरथी नाल्यावरून ये-जा करीत असताना रविवारी (दि. 15) 20 जणांना कुत्र्याने चावा घेतला. सोमवारी (दि. 16) दुपारी दोनपर्यंत 44 जणांना तर दुपारी दोननंतर आणखी 2 जणांना चावा घेतला. कुत्रा जखमी झाल्याने तसेच त्याच्या अंगावर पाणी टाकत त्यास बांधून ठेवण्याची मोठी कसरत रहिवासी नागरिकांनी केली. दरम्यान, आळंदी नगरपरिषद प्रशासनास कळविण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड पशुवैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्यात कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारास सुपूर्द करण्यात आल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक विजय गावडे, महेश पाचुंदे, नेचर फाऊंडेशचे अध्यक्ष भागवत काटकर, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींनी प्रशासनाला ही माहिती दिली.

आळंदीत विविध ठिकाणी झालेल्या कुत्रा चावण्याच्या घटनेत ६६ जण जखमी झाले. यामुळे परिसरात नागरिकांसह भाविकांत संताप पसरला. मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी विविध सेवाभावी संस्थांसह आळंदी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर यांनी केली आहे.

यासंदर्भात आळंदी शहर भाजपच्या वतीने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे लक्ष वेधण्यात येत असल्याचे भागवत काटकर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने कामकाज करण्याची मागणी करण्यात आली.

आळंदीतील सार्वजनिक मोकळ्या जागा, रस्ते, इंद्रायणी नदी घाट, मरकळ रस्ता, चावडी चौक, वडगाव रस्ता, भैरवनाथ चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे फिरत असतात. वडगाव चौक, चावडी चौक, मंदिर परिसर, मरकळ रस्ता, शालेय परिसरात फिरत असलेले मोकाट कुत्रे यामुळे शाळेची मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, वारकरी भाविक यांना रहदारीला गैरसोयीचे व भीतिदायक होत आहे. अनेकांना यामुळे यापूर्वीही दुखापती झाल्या आहेत. भाविक, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आळंदी नगरपरिषदेने शहरातील मोकाट कुत्रे यांना अँटी रेबिजीकरण करण्याची गरज आहे.

आळंदीतील नागरिकांकडे वैयक्तिक मालकीचे कुत्रे असतील त्यांच्या गळ्यात पट्टे आणि त्यांच्यापासून नागरिकांना, शेजारी यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचना आदेश नगरपरिषदेने काढावेत. तसेच खासगी कुत्रे यांची अभिलेखात नोंद नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाविक, नागरिक तसेच शालेय मुले यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तत्काळ उपाययोजना न केल्यास या मागणीसाठी सनदशीर मागनि आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

प्रदक्षिणा रोडवर भटक्या कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रदक्षिणा मार्गावरील श्री विठ्ठल-रुक्मिणी चौकात शाळा आणि क्लासेससाठी ये-जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर ही मोकाट कुत्री सर्रास धावून जातात. यामुळे अनेक लहान मुलेही यांची शिकार ठरतात. यामुळे प्रशासनाने वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर पाळीव कुत्र्यांना नागरिक रस्त्यावर, शेजारील मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी त्यांना शौचालय करण्यास घेऊन जातात. त्याचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागतो. यामुळे नागरिक मोकाट कुत्र्याच्या त्रासाला वैतागले असून, नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?