‘धडक 2’ ते ‘दे दे प्यार दे 2’ पर्यंत, हे 5 रोमँटिक चित्रपट 2025 मध्ये होणार रिलीज
वर्ष 2024 लवकरच संपणार आहे आणि येत्या 2025 पासून लोकांना खूप अपेक्षा आहेत. यातच बॉलिवूड चित्रपट निर्माते देखील त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल खूप उत्सुक आहेत. 2025 मध्ये ॲक्शन आणि थ्रिलरसह विविध जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होतील, परंतु आज आम्ही तुम्हाला आगामी रोमँटिक चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. 2025 मध्ये अनेक रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यांची जोरदार चर्चा आहे. कोणते आहेत हे चित्रपट, जाणून घेऊ…
हे रोमँटिक चित्रपट 2025 मध्ये येत आहेत
‘नखरेवाली’
नखरेवाली हा चित्रपट 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होत आहे. ज्याचे दिग्दर्शन राहुल शांकल्या यांनी केले आहे. अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव या चित्रपटात दिसणार आहेत.
‘धडक 2’
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा रोमँटिक चित्रपट धडक 2 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटाचा हा सिक्वेल असेल.
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’
शशांक खेतान दिग्दर्शित हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण धवन सनीच्या भूमिकेत दिसणार आहे, तर जान्हवी कपूर तुलसीच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘दे दे प्यार दे 2’
2021 मध्ये प्रदर्शित झालेला दे दे प्यार दे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. दे दे प्यार दे 2 हा चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता अजयचा रेड 2 त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे त्याची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
‘है जवानी तो इश्क होना है’
डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List