बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय… मराठवाड्यात ठिकठिकाणी मोर्चा
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशीव, परभणीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी बांगलादेशातील पीडित हिंदूंना भारतात आश्रय देण्याची मागणी करण्यात आली.
बांगलादेशात शेख हसिना यांचे सरकार परागंदा झाले असून नोबेल पारितोषिक विजेते मोहंमद युनूस यांच्याकडे देशाची हंगामी सूत्रे सोपवण्यात आली आहेत. हंगामी सरकारच्या काळात बांगलादेशातील हिंदूंवर अतोनात अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरांवर हल्ले करण्यात आले असून हिंदू व्यापाऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर लूट करण्यात आली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱया अत्याचारांच्या निषेधार्थ आज मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशीव, परभणीसह ठिकठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List