“..तर मग तुम्ही येऊच नका”; मुख्यमंत्र्यांवर का भडकला सोनू निगम?

“..तर मग तुम्ही येऊच नका”; मुख्यमंत्र्यांवर का भडकला सोनू निगम?

प्रसिद्ध गायक सोनू निगमचा शो नुकताच राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र परफॉर्मन्सचा हा अनुभव सोनू निगमसाठी फारसा चांगला नव्हता, कारण शो सुरू असतानाच बरेच मान्यवर, विशेषकरून राजकीय नेते मध्येच उठून गेल्याचं त्याने पाहिलं. अखेर शो संपल्यानंतर सोनू निगमने सोशल मीडियावर आपली नाराजी बोलून दाखवली. भविष्यात असं वागू नका, अशी विनंती त्याने नेत्यांना केली आहे. सोमवारी जयपूरमध्ये ‘रायझिंग राजस्थान’ हा शो पार पडल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने थेट राजकारण्यांना संबोधित केलं. संपूर्ण कार्यक्रमासाठी थांबू शकत नसाल तर येऊच नका, असं त्याने थेट म्हटलंय. इतर मंत्र्यांसह मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीसुद्धा शो मध्येच सोडल्याचा उल्लेख सोनू निगमने या व्हिडीओत केला.

काय म्हणाला सोनू निगम?

“या शोसाठी खूप चांगले लोक आले होते. हा अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम होता. राजस्थानची शान वाढवण्यासाठी जगभरातून प्रतिनिधी आले होते. राज्याचे मुख्यमंत्री होतेच. तसंच युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री (राज्यवर्धन सिंह राठोड) सुद्धा होते. अंधारात मला सर्वांचे चेहरे दिसत नव्हते. पण तिथे बरेच लोक उपस्थित होते. शो सुरू असताना मधेच मुख्यमंत्री साहेब उठून निघाले आणि त्यांच्या पाठोपाठ इतरही काही लोक निघून गेले. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ प्रतिनिधीसुद्धा कार्यक्रमातून निघाले. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो की, तुम्हीच तुमच्या कलाकारांचा आदर केला नाही तर बाहेरचे लोक काय करणार? अमेरिकेत किंवा इतरत्र मी कधीच एखाद्या राष्ट्रपतीला परफॉर्मन्सदरम्यान मध्यभागी निघून जाताना पाहिलं नाही. निदान ते जाण्यापूर्वी कळवतात तरी. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की असं मधेच निघून जावं लागत असेल तर कार्यक्रमाला येऊच नका किंवा शो सुरू होण्यापूर्वीच निघून जा”, असं सोनू निगम म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

कार्यक्रमातून असं मधेच निघून जाणं म्हणजे कलाकारांचा अपमान करणं, असं म्हणत त्याने निराशा व्यक्त केली. “एखाद्या कलाकाराच्या कार्यक्रमातून असं मधेच निघून जाणं अत्यंत अपमानास्पद आहे. हा देवी सरस्वतीचा अपमान आहे. खरंतर तुम्ही निघून जाताना माझ्या लक्षात आलं नाही. पण तुम्ही गेल्यावर मला लोकांकडून बरेच मेसेज आले. कार्यक्रमातून अशा पद्धतीने निघून जाणाऱ्या राजकारण्यांसाठी शो करू नका, असा मेसेज मला लोकांनी केला. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्हाला निघायचं असेल तर शो सुरू होण्यापूर्वी निघा. बसूच नका. मला माहीत आहे की तुम्ही चांगले आहात आणि तुमचं शेड्युल खूप व्यस्त असतं. तुमच्याकडे खूप कामं असतात, तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पडता. म्हणूनच शोसाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही त्याआधीच निघा. ही नम्र विनंती आहे”, अशा शब्दांत सोनू व्यक्त झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट
जॅकलिन फर्नांडिसला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिले आहे, “माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस. तुझे...
गुणरत्न सदावर्ते लवकरच झळकणार चित्रपटात, निर्माते-दिग्दर्शकांसोबत बोलणं सुरु, तारीखही निश्चित?
अनेक समस्यांवर औषधी गुळवेल ‘या’ लोकांसाठी ठरते घातक… एकदा नक्की वाचा
Video – बीड, परभणी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक; सरकारला फटकारले
दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा
Video – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा; ईडी, सीबीआयला वरून आदेश आला! अरविंद केजरीवाल याचा खळबळजनक आरोप
मिंधेंच्या खासदाराचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; पोलिसांची हप्ते वसुली, सामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप