Salman Khan: ‘या’ महिलेला सलमान खान मानतो संपूर्ण विश्व, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला…

Salman Khan: ‘या’ महिलेला सलमान खान मानतो संपूर्ण विश्व, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला…

Salman Khan Social media Post: अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. भाईजान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. जगभरात सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या भार मोठी आहे. पण अभिनेत्यासाठी संपूर्ण जग त्याचं कुटुंब आहे. सलमान खान याच्या आई सलमा खान यांचा वाढदिवस आहे.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सलमान खान याने खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सलमान खान याने भाऊ सोहैल खान आणि आई सलमा खान यांचा डान्स करताना एक व्हिडीओ सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओ पोस्ट करत भाईजानने कॅप्शनमध्ये, ‘मम्मी हॅप्पी बर्थडे… मदर इंडिया, आमचं जग…’ असं लिहिलं आहे. सलमान खान याच्या पोस्टवर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रीटी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 

बॉलीवूडमधील दिग्गज लेखकांची जोडी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या डॉक्युमेंट-सीरीज अँग्री यंग मॅनमध्ये, अरबाज खानने सांगितलं होतं की, सलमा खान यांनी कधीच मुलांना दुसरी आई हेलन यांच्याबद्दल काहीही चुकीचं सांगितलं नाही.

अरबाज खान म्हणाला होता, ‘आमच्या आईने कधीच आमच्या वडिलांविरोधात आम्हाला काही सांगितलं नाही. आईच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. पण त्यांनी कधीच आम्हाला असा विचार करु दिला नाही की, तुमचे वडील कसे आहेत… ते असं काही करतात… असं कधीच झालं नाही…’

पुढे अरबाज म्हणाला, ‘अर्पिता खान आणि अलवीरा खान अग्निहोत्री यांच्यापासून कुटुंबातील प्रत्येक लहान सदस्य हेलन यांना आंटी म्हणून हाक मारतो… जेव्हा हेलन आमच्या आयुष्यात आल्या तेव्हापासून आम्ही त्यांना आंटी म्हणून हाक मारतो… हेलन यांना देखील आम्ही आमच्या आईप्रमाणे मानतो… त्या देखील आता आमच्या आयुष्याचा एक भाग आहेत… आमची आई देखील हेलन यांच्या प्रत्येक आवडी-निवडीची काळजी घेत असते…’ असं देखील अरबाज खान शोमध्ये म्हणाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट
जॅकलिन फर्नांडिसला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिले आहे, “माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस. तुझे...
गुणरत्न सदावर्ते लवकरच झळकणार चित्रपटात, निर्माते-दिग्दर्शकांसोबत बोलणं सुरु, तारीखही निश्चित?
अनेक समस्यांवर औषधी गुळवेल ‘या’ लोकांसाठी ठरते घातक… एकदा नक्की वाचा
Video – बीड, परभणी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक; सरकारला फटकारले
दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा
Video – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा; ईडी, सीबीआयला वरून आदेश आला! अरविंद केजरीवाल याचा खळबळजनक आरोप
मिंधेंच्या खासदाराचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; पोलिसांची हप्ते वसुली, सामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप