आठवडाभर विचार करत होतो की…; मोदींना भेटल्यावर काय म्हणाला रणबीर कपूर
हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव असलेले राज कपूर यांची 100 वी जयंती येत आहे. राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ते व्यक्तीमत्व आहे ज्यांनी बॉलीवूडला सर्वात सुवर्णकाळ दिला. त्यामुळे त्यांची 100 वी जयंती या वर्षी अधिक खास बनवण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब कामाला लागलं आहे. त्यानिमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संपूर्ण कपूर कुटुंब मोदींना निमंत्रण देण्यासाठी दिल्लीत पोहोचलं होतं. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर करीना कपूरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या खास क्षणांचे फोटो कपूर कुटुंबियांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बॉलिवूड अभिनेता आणि राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर म्हणाला की, आमच्या कुटुंबाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्यामध्ये आम्ही चर्चा करत होतो की, तुम्हाला भेटल्यावर काय बोलायचं. त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं की, तुम्हाला हवे ते तुम्ही बोलू शकतात. मी ही तुमच्याच कुटुंबातील आहे.
रणबीर पंतप्रधानांना काय म्हणाला?
पीएम मोदींना भेटायला आलेल्या राज कपूर यांची मुलगी आणि ऋषी कपूर यांची बहीण रीमा कपूर यांनी ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या हिट गाण्याची एक ओळ बोलून त्यांच्या वडिलांची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, आज या खास प्रसंगी मला वडिलांच्या चित्रपटातील गाण्याची एक ओळ आठवते आहे – ‘मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगे निशानियां’’. पंतप्रधानांशी संवाद साधताना रणबीर कपूरने सांगितले की, मी आठवडाभरापासून या तयारी करत होतो, पण भेटल्यावर काय बोलावे हे समजत नव्हते. त्याची मावशी रीमाही त्याला रोज फोनवर हे विचारायची. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान हसत हसत म्हणाले की, मी सुद्धा तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे, तुम्हाला जे हवे ते बोलू शकता.
राज कपूर यांची जयंती
रणबीर कपूरने सांगितले की, राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त एक फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला जात आहे. जिथे संपूर्ण चित्रपट समुदाय जमणार आहे. त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीवरील प्रभाव या महोत्सवात लक्षात राहील. हा महोत्सव 13-15 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये सुमारे 40 शहरांमधील 135 हॉलमध्ये त्यांचे 10 सर्वोत्तम चित्रपट दाखवले जातील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List