…तर हे सरकार भोंदूगिरी करतंय, बांग्लादेशातील हिंदूंच्या स्थितीवरून संजय राऊत यांचा मोदी शहांवर निशाणा
बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून तेथील हिंदूंवर तसेच मंदिरांवर हल्ले सुरू आहे. या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत. मात्र अद्याप केंद्रातील एनडीए सरकारने याबाबत कोणतिही ठोस पाऊले उचलेली नाहीत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
”बांग्लादेशात सत्तापालट झाल्यापासून तेथील कट्टरपंथीय हिंदूंवर हल्ले करत आहेत. हिंदूंच्या मुलीबाळींवर हल्ले होत आहेत, हिंदूचे खून सुरू आहेत, हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. इस्कॉनचे पुजारी चिन्मय दास यांना देशद्रोह्याच्या आरोपाखाली अटक झाली. हिंदूंच्या वकीलांच्या हत्या होत आहेत. ही स्थिती स्वत:ला हिंदूंचे नेते समजून घेणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना विचलीत करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवरच चर्चा होत असेल तर हे सरकार भोंदूगिरी करताय, ढोंग करतंयच, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी शहांवर निशाणा साझला.
” भाजपला हिंदू फक्त मतांसाठी हवा आहे. हा प्रकार जर पाकिस्तानात झाला असता तर इंडिया गेटसमोर उभं राहून प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तान में घुसके मारेंगे असं भाषण केलं असतं. निवडणूका नाहीत त्यामुळे यांनी असं भाषण केलेलं नाही. देशात जर आता निवडणुका असत्या तर त्यांनी या देशात एक वातावरण निर्माण केलं असंत. आता निवडणूका नाहीत त्यामुळे हिंदू जगला काय आणि मेला काय त्यांना फरक पडत नाही. भारताच्या सीमा सिल करून हिंदूंना हिंदुस्थानात येण्यापासून रोखलं जातंय. प्रधानमंत्र्यांनी यात स्वत: लक्ष घातलं पाहिजे. सरकारला वाटत असेल की बांग्लादेशमधील हिंदूंचा विषय हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. तर तसं अजिबात नाही. हा आपल्या देशाचा विषय आहे. संपूर्ण देशात ठिकाठिकाणी उग्र आंदोलनं सुरू आहेत. त्यात भाजप आरएसएस कुठेच नाही. हरयाणा, पश्चिम बंगाल महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. पण नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाही, नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या हिंदूवर एक शब्द काढत नाही. अमित शहा बोलत नाही. देशाची फाळणी झाल्यामुळे तो हिंदू तिथे आहे. त्यांच्यावर कोण बोलणार. त्यांचा आवाज कोण मांडणार. जॉर्ज सोरोस सारख्या फालतू मुद्द्यावर भाजपचे लोकं लोकसभा, राज्यसभा बंद पाडतात. पण बांग्लादेशमधील हिंदूंच्या अत्याचारावर भाजप एक शब्द काढत नाही, आमचे स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत आहेत’, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List