धक्कादायक! निवडणूक काळात 167 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
राज्यात निवडणुकीच्या 60 दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल 167 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ अशा विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणीही हीच स्थिती असून केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे धोरण, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तीत होणारे शेतकऱयांचे नुकसान अशा प्रमुख कारणांमुळे शेतकऱयांच्या आत्महत्या वाढत असल्याचे डॉ. नवले यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून शेतीमालाला रास्त दर देत, नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱयांना दिलासा देणारी धोरणे आखावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बँक अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
जालन्यातील अंबड तालुक्यातील करंजळा येथील कृष्णा आमटे या 35 वर्षीय तरुण शेतकऱयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एसबीआय बँकेतील व्यवस्थापकाच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. बँक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांसह करंजळा गावकऱ्यांनी घेतली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List