‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क

‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. येत्या 23 नोव्हेंबरला शनिवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज राज्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. मतदार मोठ्या उत्साहात मतदानासाठी घराच्या बाहेर पडत आहेत. नव्वदी पार वृद्धांपासून ते नवमतदार तरुणांपर्यंत सर्वांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये हळदीच्या मंडपातून येवून एका नववधूने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सायली राजेंद्र वर्तक असं या तरुणीचं नाव आहे.

पालघर जिल्ह्यातल्या  विरारमध्ये हळदीच्या मंडपातून येवून एका नववधूने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सायली राजेंद्र वर्तक (वय २९) वर्षे असे मतदान केलेल्या नववधूचे नाव असून ती एका खाजगी बँकेत मॅनिजर पदावर काम करते. तीने विरार पूर्व फुलपाडा जनकपूर धाम येथील लोकमान्य हिंदी हायस्कूल मधील बुथ केंद्रावर जावून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.सायलीचे लव्ह मॅरेज असून २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर येथे तिचा विवाह होणार आहे. यावेळी बोलताना सायलीनं सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे, तुम्ही देखील तुमच्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं सायलीने म्हटलं आहे.

23 नोव्हेंबरला मतमोजणी 

आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.  तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षामध्ये फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला त्यानंतर ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले, दुसरीकडे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत भाजपला पाठिंबा दिला आणि सत्तेत सहभागी झाले. या सर्व घडामोडींनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यानं मतदार राजा कोणाच्या बाजुनं कौल देणार? राज्यात कोणाचं सरकार येणार महाविकास आघाडी की महायुती? याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. दरम्यान मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप हा...
Exit Poll Results 2024 Maharashtra : मविआ आणि महायुतीतला मोठा भाऊ कोण? एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार जिंकणार? पाहा अंदाज
अजित पवार की शरद पवार? कोण पॉवर फुल्ल?, कुणाच्या वाट्याला किती जागा?; एक्झिट पोलने घाम फोडला
Maharashtra Exit Poll 2024 Results : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष, दबदबा कायम? एक्झिट पोलने कुणाला धक्का?
Exit Poll Results 2024 : सत्ता परिवर्तनाला लाडक्या बहि‍णी आडव्या? योजनेचा महायुतीला फायदा? Exit Poll च्या आकडेवारीचा काय दावा
श्वेता तिवारी 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी केलं तिसरं लग्न? व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?
मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे खूपच दु:खद….”