… हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी-शहा यांनी चोरलेला बाण; कैलास पाटील यांचा हल्लाबोल

… हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी-शहा यांनी चोरलेला बाण; कैलास पाटील यांचा हल्लाबोल

हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी शहा यांनी चोरलेला बाण आहे. अशा लोकशाहीला पायदळी तुडवणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून गाडण्यासाठी जनतेनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन कैलास पाटील यांनी जनतेला केलं. तालुक्यातील खडकी येथे आयोजित सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी थेट भाजप सरकारवर आक्रमक शब्दांत टीका केली.

कैलास पाटील म्हणाले, हिंदुत्ववादी म्हणून गळा काढणाऱ्या भाजपच हिंदुत्व नकली आहे. अन्यथा यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांचा पक्ष फोडला नसता, त्यामुळे ज्या चिन्हावर बाळासाहेबांचा निष्ठावंत प्रेम करायचा ते चिन्ह देखील चोरून यांना मतांची भीक मागावी लागत आहे. हा बाण बाळासाहेबांचा नाही तर मोदी शहा यांनी चोरलेला आहे. याचा बदला जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत घेतला आहे. पण गद्दारी गाडून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणार आहे, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

मोठ्या व्यापारी वर्गाला फायदा करून देण्यासाठी भाजप सरकारने सामान्यांच्या जीवनात अडथळे उभे केले आहेत. चॉकलेट, कोका-कोला, पेप्सी यांसारख्या महागड्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली, तरी सामान्यांच्या जीवनावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. पण या वस्तू तयार करणाऱ्या उद्योगपतींना सवलत देण्यासाठी भाजप सरकारने साखरेच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यातूनच हे स्पष्ट होते की, भाजपचे धोरण हे मोठ्या व्यापाऱ्यांना सोयीस्कर आहे, तर दुसरीकडे शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

शेतकऱ्यांचे हाल आणि भाजपचे अनियंत्रित GST धोरण

शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत भाजपने शेतकरी विरोधी धोरणं राबवली आहेत. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतावर 18% GST आहे. ज्यामुळे त्यांना वाढीव खर्च सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, हेलिकॉप्टरसारख्या आलिशान वस्तूंवर मात्र 5% GST लावला जातो. ट्रॅक्टरसारख्या शेतकरी गरजेच्या वस्तूंवर हा कर अधिक असून भाजप सरकारने शेतकऱ्यांना संपन्न समजून त्यांच्या गरजांना दुर्लक्षित केले आहे. जेव्हा उद्योगपतींच्या 15 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते, तेव्हा शेतकऱ्यांसाठी मात्र विविध अटी-शर्ती लावून त्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवले जाते. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवत फक्त आपल्याच आर्थिक फायद्याची सोय केली आहे, अशी जळजळीत टीका कैलास पाटील यांनी केली.

लाडकी बहीण’ नाही, ही ‘लाडकी खुर्ची योजना’

महायुतीच्या ‘लाडकी बहिण योजना’वर देखील कैलास पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली. लोकसभेत भाजपचा पराभव झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला ‘लाडकी बहीण’ असे नाव दिले असले तरी, ही योजना लाडक्या खुर्चीसाठी तयार करण्यात आली आहे. भाजपने जनतेच्या मतांचा अनादर करत सत्ता गुवाहाटीमार्गे घेतली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांसाठी महिला मतदारांना भुलविण्याचे पाऊल उचलले आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस, तेल, जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढलेले असताना भाजप सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’तून काहीही लाभ होणार नाही. योजना केवळ मतांसाठीचा एक पोकळ गाजावाजा आहे, ज्यातून सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे, असेही कैलास पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम
भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सध्या लतादीदींवर एक पुस्तक लिहीत आहेत. या पार्श्वभूमीवर लतादीदींच्या सांगीतिक कार्याचा आणि त्याअनुषंगाने येणाऱया खूप वेगळ्या,...
धक्कादायक! ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलेने कुऱ्हाडीने वार करत वडिलांचीच केली हत्या
अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरला ही चूक पडली महागात, बॉलिवूड करिअरवर परिणाम
मुकेश खन्ना यांनी टायगर श्रॉफची उडवली खिल्ली, म्हणाले तो शक्तीमानच्या लायकीचा…
सेटवर करायची सफाईचं काम; अनेकदा रिजेक्ट झाली, अभिनेत्रीने दिले एकाच वर्षात 8 हिट चित्रपट, शाहरुखची फिल्म नाकारली
कपिल शर्माच्या शोला कॉमेडी नडली, थेट कायदेशीर नोटीस; सलमान खानच्या टीमने केले हात वर म्हाणाले,” आमचा काय संबंध….”
जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या