श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला बिष्णोई गँगच्या रडारवर?
दिल्लीसह देशभरात गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आफताब पूनावाला बिष्णोई गँगच्या रडावरवर असल्याची माहिती सूत्रांकडून कळते. या माहितीनंतर महाराष्ट्र एटीएस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
वसईतील रहिवासी असलेली श्रद्धा वालकर हिची मे 2022 मध्ये आफताबे हत्या केली होती. हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले होते. यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. आफताब आणि श्रद्धा दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.
हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर आफताबला अटक करण्यात आली. गेली दोन वर्षे आफताब तिहार तुरूंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, आफताब बिष्णोई गँगच्या रडारवर का आहे याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List