एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरे कडाडले

एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची श्रीगोंद्यातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी कशाप्रकारे राज्यातील सहकार खाते देखील अमित शहा यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्याचे सांगितले. तसेच जर आताच यांना रोखले नाही तर सहकार खातं पूर्णपणे आपल्या हातातून जाईल, असा इशारा देखील यावेळी दिला. तसेच महाविकास आघाडीच्या सभेत येणाऱ्या महिलांना धमकी देणारे कोल्हापूरचे भाजप खासदार धनंजय महाडिक यांना देखील उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. ”जर इथे येणाऱ्या एकाही महिलेच्या केसाला धक्का जरी लागला तर तुझा हात जागेवर ठेवणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांना दिला.

”निवडणूक चार पाच दिवसावर आलेली आहे. मला असं वाटतं माझी बॅग ऑटो चेकींगवर टाकली आहे. आज तिसऱ्यांदा माझी बॅग तपासली. पण जसा माझी बॅग तपासल्याचा व्हिडीओ देशभर गेला. त्यानंतर ज्यांच्या भाषणाला प्रसिद्धी मिळत नाहीए ते देखील आता निवडणूक आयोगाकडून आपल्या बॅगा तपासून घेत आहेत. माझ्या व्हिडीओ नंतर निवडणूक आयोगाला देखील एक नोटीस जारी करावी लागली. त्यात त्यांनी म्हटलं की पंतप्रधान सोडले तर इतर सर्वांच्या बॅगा तपासल्या जाणार. माझा बॅग तपासणीला विरोध नाहीच आहे. पण पंतप्रधानांची बॅग दखील तपासली गेली पाहिजे. ते देशाचे प्रधानमंत्री असले तरी ते एका पक्षाच्या प्रचाराला येत आहेत. जागोजागी फिरत आहे, रस्त्यांवर प्रचार रॅली घेत आहेत. ते देशाचे प्रधानमंत्री म्हणून प्रचार करत नाहीएत. त्यांच्याकडे कुठलं पद आहे. मी किमान एका पक्षाचा प्रमुख तरी आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”इथला हा पट्टा सहकार पट्टा आहे. इथे साखर कारखाने आहेत. आतापर्यंत सहकार हे खातं फक्त राज्यापुरतं मर्यादित होतं. पण हे जे वर दोन ठग बसले आहेत. त्यांनी वर्षभरात केंद्रात देखील एक सहकार खातं तयार केलंय व ते खातं अमित शहा स्वत:च्या बुडाखाली घेऊन बसले आहेत. याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार. कर्ज तुम्ही काढणार, कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहांच्या मुंग्यां लागणार. हळू हळू सगळं सहकार खातं ते ताब्यात घेतील. जर का उद्या असं झालं तर कारखाने आजारी पाडले, ते बंद प़डतील व मग त्यानंतर ते कारखाने फुकट्यात ताब्यात घेतले जातील. जशी मुंबई अदानीच्या घशात घातली जातेय अगदी तसंच होईल. त्यामुळे महाराष्ट्राचं आयुष्य मोदी शहांच्या हातात जाणार असेल तर सर्वांनीच आपण आत्महत्या केलेल्या बऱ्या. यांना आता रोखलं नाही तर सहकार खातं गेलं म्हणून समजा”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाचे मुद्दे –

– काल मी सिंधुदु्र्गात गेलेलो. महाराष्ट्रात जो जन्माला येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांविषय प्रेम धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो. पण हे भाजप मिंधे एवढे कर्मदरिद्री आहेत जिथे जातायत तिथे खातायत. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला.

– आम्ही बहिणीला तीन हजार रुपये तर देऊच पण महिलांची सुरक्षा अधिक वाढवू. राज्यात महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन तयार करू. त्यामुळे महिलांना कधीही पोलीस स्टेशनमध्ये जायला भिती वाटणार नाही.

– कोल्हापूरला भाजपचा जो मुन्ना महाडीक आहे त्याने एका सभेत सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा. पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिथे असं चालणार नाही. मी त्याला सांगतो की महिलांचे परवानगीशिवाय फोटो काढणे गुन्हा आहे आणि इथे बसलेल्या एकीच्या केसाला जरी धक्का लागला तर तुझा हात जागेवर ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

– या माता बहिणी तुम्हाला तुमच्या नोकर वाटल्या का? या लोकांचे नेतेच असे आहेत मग हे का नाही शेफारणार. कर्नाटकात नरेंद्र मोदी महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा सांगत होते. असे महिलांवर अत्याचार करणाऱ्याच्या प्रचारात हेजातायत. यांना एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे कडाडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम
भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सध्या लतादीदींवर एक पुस्तक लिहीत आहेत. या पार्श्वभूमीवर लतादीदींच्या सांगीतिक कार्याचा आणि त्याअनुषंगाने येणाऱया खूप वेगळ्या,...
धक्कादायक! ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलेने कुऱ्हाडीने वार करत वडिलांचीच केली हत्या
अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरला ही चूक पडली महागात, बॉलिवूड करिअरवर परिणाम
मुकेश खन्ना यांनी टायगर श्रॉफची उडवली खिल्ली, म्हणाले तो शक्तीमानच्या लायकीचा…
सेटवर करायची सफाईचं काम; अनेकदा रिजेक्ट झाली, अभिनेत्रीने दिले एकाच वर्षात 8 हिट चित्रपट, शाहरुखची फिल्म नाकारली
कपिल शर्माच्या शोला कॉमेडी नडली, थेट कायदेशीर नोटीस; सलमान खानच्या टीमने केले हात वर म्हाणाले,” आमचा काय संबंध….”
जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या