मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; उपचार सुरू
अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक तब्येत खालावली आहे. मागच्या काही दिवसांपासून जरांगे पाटील मराठा समाजाच्या बैठका आणि मुलाखती 24-24 तास घेत आहेत. त्याबरोबर मराठा आंदोलकांची आंतरवाली सराटीत दररोज गर्दी होत असल्याने त्यामुळे जरांगे पाटील यांची झोप होत नाही. त्यामुळे आज अचानक त्यांची तब्येत बिघडली. अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा जाणवत असून तापही आलेला आहे.
आजारी पडल्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे यांच्या टीमने आंतरवाली सराटी येथे उपचार सुरू करुन प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असली तरी उद्या होणारी दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाची महत्त्वाची बैठक ते घेणार आहेत. उद्याची बैठक झाल्यानंतर या बैठकीत जो काही निर्णय होईल, तो दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कळवण्यात येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List