वार्तापत्र – पनवेलमध्ये परिवर्तन घडणार, ‘दिखाऊ’ विकास भाजप आमदाराला भोवणार

वार्तापत्र – पनवेलमध्ये परिवर्तन घडणार, ‘दिखाऊ’ विकास भाजप आमदाराला भोवणार

गेली 10 वर्षे भाजपचा आमदार असूनही पनवेलमधील मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. महापालिकेतील भ्रष्टाचार, अतिक्रमणांचा विळखा, पाणीटंचाई यांमुळे पनवेलमधील नागरिकांचा भाजप आणि महायुतीविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारसंघात यावेळी बदल नक्की घडणार असेच वातावरण आहे. पनवेलकरांची साथ सोबत महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार लीना गरड यांना मिळत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात ‘मशाल’चे तेज पाहायला मिळत आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या लीना गरड आणि महायुतीचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. बाळाराम पाटील अपक्ष रिंगणात असले तरी त्यांच्या धरसोड भूमिकेमुळे मतदारांचा त्यांच्यावर भरोसा नाही. प्रशांत ठाकूर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पैकी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर तर नंतर दोनदा भाजपच्या तिकिटावर ते जिंकून आले. मात्र ठाकूर भाजपमध्ये गेल्यापासून पनवेलमधील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे.

पनवेल महापालिकेला भाजपचे प्रशांत ठाकूर व त्यांच्या बगलबच्चे नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला. याविरोधात लीना गरड यांनी वेळोवेळी आवाज उठवून पोलखोल केली. आता लीना गरड मशाल चिन्हावर विधानसभेच्या रिंगणात असल्याने विरोधकांनी त्यांचा धसका घेतला आहे. त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सातत्याने आघाडीवर असल्याने हा लोकसंपर्क लीना गरड यांच्या कामी येईल, असे पनवेलमध्ये वातावरण आहे.

वार्तापत्र (बेलापूर) – चौरंगी लढतीत संदीप नाईक यांचे पारडे जड

भाजप बोलतंय एक आणि करतंय दुसरंच

भाजप बोलतंय एक आणि करतंय दुसरंच याचा प्रत्यय आल्याने लीना गरड यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन पनवेल महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात लीना गरड यांनी छेडलेल्या आंदोलनामुळे पहिल्याच दणक्यात 30 टक्के मालमत्ता कर पनवेल महानगरपालिकेला कमी करावा लागला. पनवेलमधील जनतेला भाजपचा खरा चेहरा कळला असल्याने महाविकास आघाडीला विजयाची संधी आहे.

ठाकूर यांनी कुणाचा विकास केला?

आमदार म्हणून प्रशांत ठाकूर अपयशी ठरले आहेत. पाणी, मालमत्ता कर, नैना, खड्ड्यात गेलेले रस्ते, वाहतूककोंडी, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आदी प्रश्नांवरून प्रशांत ठाकूर हे चांगलेच अडचणीत आले आहेत. प्रचाराला गेल्यानंतर नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. आमदार म्हणून तुम्ही कुणाचा विकास केला, असे प्रश्न त्यांना विचारले जात असल्याने यावेळी कमळ कोमेजणार अशीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Assembly election 2024 – खडकवासलात नाराजीचा फायदा कोणाला?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम
भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सध्या लतादीदींवर एक पुस्तक लिहीत आहेत. या पार्श्वभूमीवर लतादीदींच्या सांगीतिक कार्याचा आणि त्याअनुषंगाने येणाऱया खूप वेगळ्या,...
धक्कादायक! ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलेने कुऱ्हाडीने वार करत वडिलांचीच केली हत्या
अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरला ही चूक पडली महागात, बॉलिवूड करिअरवर परिणाम
मुकेश खन्ना यांनी टायगर श्रॉफची उडवली खिल्ली, म्हणाले तो शक्तीमानच्या लायकीचा…
सेटवर करायची सफाईचं काम; अनेकदा रिजेक्ट झाली, अभिनेत्रीने दिले एकाच वर्षात 8 हिट चित्रपट, शाहरुखची फिल्म नाकारली
कपिल शर्माच्या शोला कॉमेडी नडली, थेट कायदेशीर नोटीस; सलमान खानच्या टीमने केले हात वर म्हाणाले,” आमचा काय संबंध….”
जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या