शेतकऱ्याच्या जिवावर भाजप आमदारांनी मुंबईत 100 कोटी रुपयांची घरं घेतली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांच्या जिवावर भाजप आमदारांनी 100 कोटी रुपयांची घरं घेतली असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
एका सभेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, 2014 साली शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत होता. तो भावसुद्धा आता शेतकऱ्यांना मिळत नाहीये. ना शेतीला पाणी मिळालं, ना गोसेखु्र्द प्रकल्पात पाणी आलं, 10 वर्ष हा प्रकल्प तसाच आहे. भाजपचे काही नेते म्हणतात की मुंबईत आम्ही 100 कोटी रुपयांचं घर घेतलं. एकीकडे 10 वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला. दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी मुंबईत 100-100 कोटींची घरे घेतली. भाजपला मतदान करण्याची शिक्षा मिळाली शेतकऱ्यांना, मजा मारली भाजप आमदारांनी असेही वडेट्टीवार म्हणाले.
एकीकडे १० वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला. दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी मुंबईत १०० – १०० कोटींची घरे घेतली. भाजपला मतदान करण्याची शिक्षा मिळाली शेतकऱ्यांना, मजा मारली भाजप आमदारांनी. pic.twitter.com/cPuZPRpuRh
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 30, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List