माझी बॅग तपासता मग दाढीवाले मिंधे, मोदी-शहा आणि टरबुज्याची बॅगही तपासली का? तपासणी नाटय़ावर उद्धव ठाकरे यांचा संताप

माझी बॅग तपासता मग दाढीवाले मिंधे, मोदी-शहा आणि टरबुज्याची बॅगही तपासली का? तपासणी नाटय़ावर उद्धव ठाकरे यांचा संताप

निवडणूक आयोगाच्या पथकाने यवतमाळमधील वणी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. या तपासणी नाटय़ावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. माझी बॅग तपासता मग दाढीवाले मिंधे, मोदी-शहा, टरबुज्या आणि गुलाबी जॅकेटवाल्याची बॅगही तपासली का?, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱयांना केला.

वणी येथील सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने पोहोचले. हेलिकॉप्टर उतरताच निवडणूक आयोगाचे आठ-दहा अधिकारी त्यांची बॅग तपासायला आले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना विचारणा केली. ’माझी बॅग तपासत आहात, माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली?, असा प्रश्न त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱयाला त्याचे नाव विचारताच त्याने अमोल राठे असे सांगितले. तसेच तो मूळचा अमरावतीमधील असल्याचेही म्हणाला. माझ्या दौऱयापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी राठे याला विचारताच त्याने आपण चार महिन्यांपासूनच आयोगात काम करतोय, असे सांगितले. त्यावर तुम्ही चार महिन्यांत एकाचीही बॅग तपासली नाही. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो का, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

माझी बॅग तपासायला मी अडवत नाही. पण आतापर्यंत तुम्ही दाढीवाल्या मिधेंची बॅग तपासली का? टरबुज्याची बॅग तपासली का? अजित पवारांची तपासली का? मोदी आणि अमित शहांची बॅग तपासली का? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरे यांनी केला. राठे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे मोबाईल फोनवर व्हिडियोही काढत होते. तसे त्यांनी अधिकाऱयांनाही स्पष्टपणे सांगितले. बॅग तपासण्यासाठी राठे पुढे गेले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या मोदी आले की त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडियोही काढून मला पाठवायचा. तो व्हिडियो मला आला पाहिजे. तिथे शेपूट घालायचे नाही. ठीक आहे तपासा बॅग माझी. हा व्हिडियो मी रिलिज करतोय…

राठे याने उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली. बॅगेमधला औषधे ठेवलेला पाऊचही त्याने बाहेर काढून उघडून निरखून पाहिला. त्यावर, उघडा…उघडा…उद्या तुम्हाला उघडतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पाण्याच्या बाटल्या ठेवलेला थर्मेस राठे याने उघडला असता उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हालाही हवे असेल तर घ्या, तुम्हालाही तहान लागली असेल, तुम्हीही माणसे आहात. बॅग तपासून झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकानेही बॅगेखालीही नीट चेक करा, फ्युएलची टाकी तपासायची आहे तर तीही तपासा, असे राठे यांना सांगितले. तसेच उद्या नागपूरमध्ये तुम्ही राहणार का? असेही विचारले. तपासणी सुरू असताना उद्धव ठाकरे सुरक्षारक्षकांना म्हणाले, हे लोक कोणत्या शासकीय नोकरीत आहेत तेसुद्धा पाहून घ्या. तपासणी पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, फ्युएलची टाकी तपासायची आहे का तर तीसुध्दा तपासा असे सांगितले. त्यावर नाही असे म्हणत अधिकाऱयांनी सहकार्याबद्दल धन्यवाद म्हटले.

आयोगाच्या डय़ुटीवर मध्य प्रदेशातला कॅमेरामन

हेलिकॉप्टरची तपासणी सुरू असताना एक क@मेरामन क@मेरा घेऊन शूटिंग करत होता. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्न केले. त्याचे नाव काय असे विचारताच विजय पटले असे त्यांनी सांगितले तसेच आपण मध्य प्रदेशचे आहोत अशीही माहिती दिली. तुम्ही मध्य प्रदेशचे आहात. गुजरातचे तर नाही ना? म्हणजे बॅगा तपासण्यासाठीदेखील बाहेरच्या राज्यातील माणसे आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टरसह बॅगेची तपासणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे आज विटा येथील प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली. वरून ऑर्डर आल्याने आम्ही तपासणी करत आहोत, असे संबंधित अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, बॅगा तपासण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. पण महायुतीतील मोठे नेते विटय़ात आले, तर त्यांच्या बॅगा तपासण्याची तुमच्यात हिंमत आहे का? असा संताप खासदार कोल्हे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण -सुप्रिया सुळे

माझीही गाडी काल चेक केली. मला याचा आनंद आहे आणि उपस्थित अधिकाऱयांना याबाबत प्रोत्साहनही दिले. त्यांनी जरूर सर्व चेक करावे. परंतु, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणाऱया अधिकाऱयाला केले होते निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली म्हणून 17 एप्रिल 2019 रोजी ओडिशात मोहम्मद मोहसिन या आयएएस अधिकाऱयावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी प्रचारसभेसाठी आले असता मोहसिन व त्यांच्या पथकाने मोदींच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती. एसपीजी सुरक्षेतील व्यक्तीची अशी तपासणी करता येत नाही, असे कारण देत त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, नंतर पॅटने हे निलंबन रद्द केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल
अभिनेत्री मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे फार चर्चेत आहे. तसेच या परिस्थितीतून ती सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने कित्येकदा सांगितले...
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांनी बायडन यांची घेतली भेट, सत्ता सोपवण्याबाबत झाली चर्चा
Video : आता गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवार यांचा वळसे-पाटलांना इशारा
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचे परिपत्रक जारी
काळ्या कपड्या आड Team India चा गुप्त सराव, गौतम गंभीर यांचा नवा डाव; ऑस्ट्रेलियाचं पानिपत निश्चित?
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू; आदित्य ठाकरे कडाडले
गद्दार संतोष बांगर यांच्या गुंडांची गुंडगिरी; पैसे वाटपापासून रोखले म्हणून शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली