कार्तिकिच्या उपवासाला दापोलीत कणगरांची विक्री जोरात

कार्तिकिच्या उपवासाला दापोलीत कणगरांची विक्री जोरात

कार्तिकी एकादशीच्या उपवासानिमित्त दापोली बाजारपेठेत कणगरांची विक्री जोरात झाली. त्यामुळे दापोलीत ग्रामीण भागातून विक्रीसाठी कणगर घेऊन आलेल्यांच्या विक्रेत्यांकडील कणगरांची विक्री हातोहात झाली. त्यामुळे कणगर विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते.

एकादशीचा उपवास असो, संकष्टी चतुर्थी असो वा अंगारकी चतुर्थी असो नाहीतर कोणताही उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे , उपवासाची बटाटयाची भाजी, फिंगर चिप्स , फळे आदींचा उपवासाच्या दिवशी फराळ केला जातो. तसे कणगर या कंदमुळाचेही उपवासात महत्त्व आहे. उपवासाच्या दिवशी कणघर उकडून खाल्ले जाते . जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पतींना कंदमूळं असं म्हणतात. उपवासाच्या दिवशी किंवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली येणाऱ्या कंदमुळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे त्वरीत ऊर्जा मिळू शकते. कणघर बाहेरून लाल आणि आतून पाढऱ्या रंगाची असतात. पचनास हलकं असल्यामुळे तुम्ही कणघर कधीही खाऊ शकता. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी कणघर उकडून खाल्ले जाते. कणघरमध्ये फासबर्स, व्हिटॅमिन ए, बी 6, सी, डी आणि ई, पोटॅशियम, लोह असतात. जे आरोग्यासाठी चांगले आहेत.

कंदांतील सर्वात पौष्टिक कणघरचा कंद. कोकणात हा पावसाळ्यात अनेक ठिकाणी शेतकरी उत्पादन घेण्यासाठी म्हणून लावतात. कणघरला पांढरी रताळी असेही म्हणतात. हे कंद मातीत झुबक्याने लागतात. ते आकाराने लांबट गोल असून त्यावर थोडेसे उंचवटे असतात. एका कणघरचे वजन अंदाजे 100 ते 150 ग्रॅम असते. हे उकडून किंवा चुलीतील राखेत भाजून खातात. आजारातून उठलेल्या व्यक्तीस ताकद येण्यासाठी हा कंद खायला दिला जातो.

दापोलीत खेडेगावात शेतीबरोबरच कणगराची लागवड घरामागील परसात अथवा तरवा तयार करुन केली जाते. त्या कणगराचे उत्पादन हे दापोली बाजार पेठेत विक्रीसाठी आणले जाते. एरव्ही कणगराचा खप तेवढा होत नसला तरी उपवासानिमित्त कणगरांची विक्री होते. तसे कार्तिकी एकादशीच्या उपवासाच्या आदल्या दिवशी दापोली तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावागावातून दापोली बाजारपेठेत विक्री करिता विक्रेत्यांनी आणलेल्या कणगरांची विक्रि प्रती किलो 150 रुपये दर असुनही सोमवारी मात्र कणगरांची विक्रि हातोहात झाली. त्यामुळे ग्रामीण भागातून कणगर घेऊन दापोलीत विक्रीसाठी आलेल्या कणगर विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर चांगलेच समाधानाचे भाव असल्याचे बघायला मिळत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल
अभिनेत्री मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे फार चर्चेत आहे. तसेच या परिस्थितीतून ती सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने कित्येकदा सांगितले...
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांनी बायडन यांची घेतली भेट, सत्ता सोपवण्याबाबत झाली चर्चा
Video : आता गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवार यांचा वळसे-पाटलांना इशारा
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचे परिपत्रक जारी
काळ्या कपड्या आड Team India चा गुप्त सराव, गौतम गंभीर यांचा नवा डाव; ऑस्ट्रेलियाचं पानिपत निश्चित?
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू; आदित्य ठाकरे कडाडले
गद्दार संतोष बांगर यांच्या गुंडांची गुंडगिरी; पैसे वाटपापासून रोखले म्हणून शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली