संजय बांगर यांच्या मुलाने केली लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची झाली अनया
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन सध्या चर्चेत आला आहे. आर्यनने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली आहे. लिंगबदलानंतर आर्यनने त्याचे नाव बदलून अनया ठेवले आहे.
संजय बांगर यांच्या मुलाचे नाव आर्यन आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर करत स्वत:ची ओळख अनया अशी करुन दिली आहे. आर्यनने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया बनला आहे. आर्यनने इंस्टाग्रामवरुन याबाबत माहिती दिली आहे, ”माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. या खेळाबरोबरच एक प्रवास देखील आहे. जो माझ्याशी संबंधित आहे. माझा हा प्रवास खडतर होता. पण त्यात मिळालेला विजय हा सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.
आर्यन बांगर हा क्रिकेटपटू असून तो डावखुरा फलंदाज आहे. शस्त्रक्रियेनंतर तो म्हणाला, ”मी मला आवडत असलेल्या खेळाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. केवळ एक खेळाडू म्हणून नव्हे तर ‘मी’ म्हणून देखील. हा प्रवास माझ्यासाठी खडतर होता. ..पण स्वत:चा शोध घेणे हा सगळ्यात मोठा विजय आहे. माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे, जो माझ्या स्वतःशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा असल्याचे त्याने व्यक्त केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List