दिल्लीने डोळे वटारले की राज्यातील सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
भोसरी विधानसभा मतदारसंघात मोर्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीने डोळे वटारले की राज्यातील सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो, अशा शब्दांत त्यांनी महायुतीला फटकारले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे आयोजित महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
भोसरी मतदारसंघातील महिलांचा उत्साह पाहून येत्या 23 नोव्हेंबरला अजित दामोदर गव्हाणे यांनाच विजयाचे प्रमाणपत्र मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहिण योजनेचे पैसे बंद करु म्हणणाऱ्या भाजपाच्या खासदाराचा करेक्ट कार्यक्रम करु, असा इशाराही त्यांनी दिली. प्रत्येक महिलेसाठी सुप्रिया सुळे ढाल म्हणून लढेल, असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांमध्ये जागवला.
महाविकास आघाडीच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
भोसरी मतदारसंघातील महिलांचा उत्साह… pic.twitter.com/2FxgG2d61e
— Supriya Sule (@supriya_sule) November 11, 2024
दिल्लीने डोळे वटारले की राज्यातील सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो असे सांगून आपले राज्य आपल्या राज्यातून चालवणारे सरकार हवे असल्याचे सांगितले. या भागातील विरोधी उमेदवाराने कोणालाही त्रास दिला तर आम्ही महिला लाटणे घेऊन त्याचा बंदोबस्त करु असा इशाराही त्यांनी दिला. मायबाप जनता इमानदार असल्यामुळे आज लोकशाही जिवंत आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, त्याचबरोबर हमीभावही देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. ही निवडणूक नागरिकांच्या अधिकारांची लढाई आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महागाई, बेरोजगारी हटवू आणि भ्रष्टाचार संपवून टाकू असे सांगितले. 20 नोव्हेंबर रोजी अजित दामोदर गव्हाणे यांना मतदान यंत्रावरील क्रमांक एकसमोरील ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List