‘ये ब्रेस्ट हैं, संतरे नहीं…’, दिल्ली मेट्रोतील जाहीरातीवरुन मोठा वाद, DMRC करणार कारवाई
दिल्ली मेट्रो कायम कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असते. मेट्रोतले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरा-बायकोचे भांडण, कधी मेट्रोत आंघोळ, कधी अश्लील चाळे तर कधी मारामारीचे व्हिडीओ समोर येत असतात. आता दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिल्ली मेट्रोतील एका जाहिरातीने गोंधळ उडाला आहे. ‘बेस्ट कॅन्सर’ची एक जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे.
यूव्हीकॅन फाऊंडेशनने ‘ब्रेस्ट कॅन्सर’च्या जनजागृतीसाठी दिल्ली मेट्रोमध्ये AI निर्मित असलेली जाहिरात लावली आहे. मात्र ही जाहिरात आणखी क्रिएटिव्ह करण्याच्या नादात ती अशी काही बनवली गेली की अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ही जाहिरात अश्लील असल्याचे लोक सांगत आहेत. जाहिरात पाहून मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना लाज वाटत आहे. सोशल मीडियावरही या जाहिरातीवरून वादाला तोंड फुटले आहे.
ब्रेस्ट कॅन्सरची जनजागृतीसाठी चालवल्या गेलेल्या अभियानावर टीका होत आहे. कारण जाहिरातीत ब्रेस्टला संत्र्याची उपमा देण्यात आली आहे. दर महिन्याला तुमच्या संत्र्याची तपासणी करा, असे या जाहिरातीत लिहिले आहे. वादग्रस्त युवीकॅन फाऊंडेशनच्या पोस्टरमध्ये बसमध्ये संत्री पकडलेल्या महिलांचे एआय जनरेटेड फोटो आहेत. शरीराच्या अंगांना दर्शविण्यासाठी एखाद्या फळाचा वापर करणे हे ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची गंभीरता कमी करते आणि यामुळे त्या रुग्णांचा अनादर होतो.
अनेकांनी या जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक महिलांनी लिहिले की, ब्रेस्ट बोला, संत्री नको. अनेकांनी DMRC हँडलला टॅग करून प्रश्न विचारले आहेत. ट्रेनमध्ये अशाप्रकारच्या जाहिराती का लावायला दिल्या आहेत? या तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे. लोकांनी घेतलेला आक्षेप लक्षात घेत त्या जाहिरातीचे पोस्टर लवकर काढून टाकण्यात येईल, असे डीएमआरसीने सांगितले आहे.
तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवीकॅन फाउंडेशनने 3 लाख महिलांना जागरुक केले आहे आणि 1.5 लाख स्क्रीनिंग केल्याचे युवीकॅन फाउंडेशनच्या विश्वस्त पूनम नंदा यांनी पोस्टरचा बचाव करत म्हटले आहे. त्या म्हणाल्या, संत्र्याच्या सेवनाने स्तनांच्या आरोग्याविषयी लोक बोलत असतील आणि त्यामुळे एखादा जीव वाचला असेल तर ते सार्थक आहे. हिंदुस्थानात लोक ब्रेस्टबद्दल उघडपणे बोलायला धजावतात, असेही त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List