कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर आठ ठिकाणी चेकपोस्ट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तब्बल आठ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर निवडणूक कर्मचाऱयांसह पोलीस तैनात असणार आहेत. हे पथक चुकीच्या घटना, घडामोडीवर लक्ष ठेवून कायेदशीर कारवाई करणार आहेत, अशी माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व निःपक्ष अंमलबजावणी होण्यासाठी आठ भरारी पथके तैनात केली आहेत. दिवसा चार, तर रात्री चार पथके कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक कर्मचारी आणि तीन पोलीस कर्मचारी आहेत. या पथकाकडून येणाऱया-जाणाऱया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रोख रक्कम, शस्त्र्ा, वगैरे असे काही आढळून आल्यास तपासणीअंती थेट गुन्हा दाखल होणार आहे. अक्कलकोट विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार विनायक मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण ठाण्याचे निरीक्षक महेश स्वामी आदींनी स्थळाची पाहणी केली.
सभेच्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे असणार आहे. तसेच चार भरारी पथके असणार आहेत. दोन तपासणी पथके असणार आहेत. खर्च नियंत्रण टीम, नियंत्रण कक्ष सुरू झालेले आहेत. आचारसंहिता कक्षसुद्धा असणार आहेत. निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार गायकवाड हे काम पाहात आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर 22 ऑक्टोबरपासून नाकाबंदी सुरू केली आहे. येथे वाहनांची तपासणी केली जात आहे. रक्कम, शस्त्र अशा काही चुकीच्या बाबी आढळल्यास निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत.
– विनायक मगर, तहसीलदार
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List