Maharashtra election 2024 – मालाडमध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला

Maharashtra election 2024 – मालाडमध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला

>>मंगेश दराडे

मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघात यंदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे. सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना महाविकास आघाडीने पुन्हा एकदा संधी दिली असून त्यांचा सामना महायुतीमधील भाजपचे माजी नगरसेवक विनोद शेलार यांच्यासोबत होणार आहे. घराणेशाहीला विरोध करण्याचा आव आणणाऱ्या भाजपने स्थानिक कार्यकर्त्याला डावलून आशीष शेलार यांचे मोठे बंधू माजी नगरसेवक विनोद शेलार यांना संधी देऊन बाहेरचा उमेदवार लादल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या उत्तर मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात मढ, मार्वे, मनोरी, मालवणी, आक्सा, खारोडी आदी भागांचा समावेश आहे. या मतदारसंघात 30 टक्के मुस्लिम मतदार असून कोळी आणि मराठी मतदारदेखील मोठय़ा संख्येने आहेत. त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. या मतदारसंघातील सात नगरसेवकांपैकी काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी तीन व शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक नगरसेवक आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून भाजपचे पीयुष गोयल विजयी झाले असले तरी त्यांना मालाड पश्चिम या मतदारसंघातून लीड मिळवता आली नव्हती.

कोळी बांधवांचा मोठा पाठिंबा

महाविकास आघाडी सत्तेत असताना अस्लम शेख यांनी वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास या विभागाचे पॅबिनेट मंत्रीपददेखील भूषविले. त्यांनी देशातील पहिली वॉटर टॅक्सी तसेच मुंबई ते मांडवा रो-रो सेवा सुरू केली. मढ येथे सुसज्ज असलेल्या रुग्णालयास मंजुरी, कोळीवाडय़ात मासळी सुकविण्यासाठी चौथरे बांधणे, नौका दुरुस्ती यार्ड उभारणे, हरबा देवी तलावाचे तसेच चौपाटय़ांचे सौदर्यीकरण, अवैध मासेमारी रोखण्यासाठी कडक कायदे करणे यामुळे कोळी बांधवांचा अस्लम शेख यांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे अस्लम शेख यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. तसेच मिठ चौकी येथील वाहतूककाsंडीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

अंतर्गत धुसफुस भाजपला भोवणार

भाजपने माजी नगरसेवक विनोद शेलार यांना तिकीट दिले असले तरी स्थानिक उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार लादल्याने स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांच्या विरोधात असंतोष आहे. मालाडमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून नाराजी दर्शवली. भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री ब्रिजेश सिंह यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या अंतर्गत धुसफुसीचा फटका भाजपला बसणार आहे.

धारावी पुनर्वसनाचा मुद्दा गाजणार 

अपात्र धारावीकरांचे अक्सा आणि मालवणीत पुनर्वसन करण्याचा निर्णय अलीकडेच राज्य सरकारने घेतला आहे. याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. गावकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत आमदार अस्लम शेख यांनी भूमिपुत्रांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत अदानींच्या घशात घालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. सरकारविरोधातील नाराजीचा मोठा फटका महायुतीला बसणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई ‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या निवडणुकीत वोट जिहाद होत...
पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”
“तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..”; वादावर काय म्हणाली अंकिता?
जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं
कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील ‘हे’ कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं
भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा पोकळ; काँग्रेसच्या आराधना मिश्रा यांची टीका