मी काही साध्वी नाही, तुम्हीही पैसे कमवा; महागड्या बॅगवरून ट्रोल झाल्यानंतर जया किशोरी भडकल्या
सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या सुप्रसिद्ध कथावाचक जया किशोरी काही दिवसांपूर्वी विमानतळावर Christian Dior या महागड्या ब्रँडची बॅग घेऊन जाताना स्फॉट झाल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित झाला आणि त्यांना मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात आले. या सर्व प्रकारावरून त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
जया किशोरी म्हणाल्या की, ती एक कस्टमाइज बॅग असून त्यामध्ये कुठेही लेदरचा वापर करण्यात आलेला नाही. मी माझ्या मर्जीप्रमाणे ती बॅग बनवून घेतली आहे. त्यामुळे बॅगवर माझे नाव सुद्धा आहे. सर्व काही मोह माया आहे, पैसे कमवू नका, सर्व गोष्टींचा त्याग करा, असे मी कधीही सांगितले नाही. माझ्या कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या श्रोत्यांना हे चांगलं माहित आहे. मी स्वत: कोणत्याही गोष्टीचा त्याग केलेला नाही, तर मी तुम्हाला त्याग करायला का सांगेन?, असे जया किशोरी म्हणाल्या आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे की, मी कोही साध्वी नाही. मी एक सामान्य तरुणी असून मी एका सामान्य घरात माझ्या कुटुंबासोबत राहते. मी तरुणांना पण हेच सांगते की, तुम्ही मेहनत करा, पैसे कमवा, स्वत:च आयुष्य सुंदर करा आणि स्वप्न पूर्ण करा, असे म्हणत त्यांनी सर्व ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List