रस्त्यावर फटाकेविक्री करणाऱ्यांवर कारवाई; सर्व वॉर्डना प्रशासनाचे निर्देश, सर्क्युलर जारी
दिवाळीनिमित्त पालिकेने सर्व वॉर्डना सर्क्युलर जारी करून बेकायदेशीर फटाकेविक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व वॉर्डकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम नेमून ही कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईत दिवाळीमध्ये नाक्यानाक्यावर फटाक्यांची दुकाने थाटून विक्री केली जाते. अनेक दुकानांमध्येही बेकायदेशीरपणे फटाके विक्री सुरू राहते. यामुळे आगीसारख्या घटना घडल्याने जीवित-वित्तहानी होते. त्यामुळे पालिकेकडून दरवर्षी बेकायदेशीर फटाकेविक्री करू नये, असे आवाहन करण्यात येते. पण त्या त्या विभागातील पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List