ईडीच्या कारवाईतून सुटकेसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांची कबुली

ईडीच्या कारवाईतून सुटकेसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांची कबुली

ईडीच्या कारवाईपासून सुटका मिळविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये गेलो. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता अशी कबुली अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात दिली आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना भुजबळ यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी ईडीच्या भीतीने नाही तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेल्याचे म्हटले आहे.

मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते, असे छगन भुजबळ म्हणाले. हा सारा तपशील ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 ः द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नोंदवण्यात आला आहे. या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य आढळते.

अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाल्याच भुजबळ यांनी नमूद केले आहे.

भुजबळ यांनी पुस्तकात काय म्हटलयं

z 100 कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे.

z  प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. तिघांनी भाजपबरोबर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. त्यांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लिन चीट -भुजबळ

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लीन चीट मिळाली आहे. निवडणुकीच्या वेळेलाच हे का छापले जात आहे? याबद्दल मला आश्चर्य वाटते. मी ते पुस्तक वाचलेले नाही. त्यात काय लिहिलेले आहे? हे नंतर पाहीन. तसेच आमच्या वकिलांशीही मी चर्चा करेन. निवडणुकीनंतर जे जे चुकीचे आहे, त्यावर मी नक्कीच कारवाई करेन. नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घातलेल्या आहेत, त्याला निश्चितच आम्ही उत्तर देऊ, असं भुजबळ म्हणाले.

पुस्तकातील माहिती 100 टक्के खरी -अनिल देशमुख

छगन भुजबळ यांच्यावर दबाव होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर ईडीची नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जात जेलमध्ये जाण्यची मानसिकता नव्हती. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती 100 टक्के खरी आहे. त्यात सत्यता आहे, कारण ईडी, सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भाजपच्या सरकारमध्ये सामील व्हावे लागले, याची सर्वांना कल्पना आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल देशमुख म्हणाले.

पक्ष फुटीमागचे मुख्य हत्यार ईडीचा दबाव संजय राऊत

एकनाथ शिंदेंपासून अजित पवार हे सगळे ईडी आणि सीबीआयपासून बचाव करण्यासाठी, आपली कातडी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी ते भाजपसोबत गेले आहेत. पक्ष फोडीमागंच मुख्य हत्यार ईडीचा दबाव हेच होतं. प्रफुल्ल पटेल भाजपसोबत गेले नसते तर त्यांची इस्टेट मोकळी झाली नसती. भाजपबरोबर जाताच सध्या तरी त्यांच्या फायली बंद करण्यात आल्या आहेत. हसन मुश्रीफ असो वा दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेतून फुटून गेलेले लोकांनी ईडीला घाबरून पलायन केलं आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.हे लोक आत बोलत आहेत, कारण त्यांना भीती यासाठी वाटत नाही कारण राज्यातील सरकार बदलणार आहे. शिवाय यांनी जे काही साध्य करायचं होतं ते मागील दोन वर्षात साध्य करून घेतलं आहे. भुजबळ तुरूंगात जाऊन आले, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर असतील या सगळ्यांनी आपल्या पक्षाच्या, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पळून गेले. त्यानंतर त्यांची चौकशी बंद करण्यात आली. या सर्वांप्रमाणे माझ्यावरही मोठा दबाव होता. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यावर देखील दबाव होता.  मात्र, आम्ही या दबावाला बळी पडलो नाहा. ज्यांच शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असतं, असे लोक पळून गेले असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता

अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते. या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता, असे या पुस्तकात नमूद केले आहे.

n भाजपशी हातमिळवणीच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील वा यंत्रणा पाठपुरावा करणार नाहीत. तसेच विखुरलेले विरोधक की स्थिर सरकार देणारे मोदी असे पर्याय होते. आम्ही स्थिर सरकारला प्राधान्य दिले, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास जाणवतात ही लक्षणे, दुर्लक्ष करु नका व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास जाणवतात ही लक्षणे, दुर्लक्ष करु नका
शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. मात्र, आजकाल खाण्यापिण्याच्या...
लहान मुलांना दुधाच्या बॉटलने दूध पाजताय तर सावधान, हिवाळ्यात घ्या विशेष काळजी
रत्नागिरीत हातखंबा नाक्यावर 35 लाखांचे सोने पकडले; ‘एसएसटी’ पथकाची कारवाई
हातात मशाल घेतलेली जनता रावणाची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विश्वास
रत्नागिरीत 13 बांग्लादेशी नागरिकांना पकडले
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 942 जणांचे टपाली मतदान
उद्योगपतींना 16 लाख कोटींची कर्जमाफी देणाऱ्या नरेंद्र मोदींनी एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?: राहुल गांधी