समर्थ रामदासांनी तरुणांची मोट बांधून शिवरायांना पाठिंबा दिला; शहांचे मराठय़ांच्या इतिहासावर आक्रमण…

समर्थ रामदासांनी तरुणांची मोट बांधून शिवरायांना पाठिंबा दिला; शहांचे मराठय़ांच्या इतिहासावर आक्रमण…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मराठय़ांच्या इतिहासावर आक्रमण केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रचारसभेत बोलताना शहा भरकटले आणि त्यांनी एक भाकडकथा सांगितली. ‘समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे काम केले,’ असे विधान शहा यांनी केले. शहा यांनी इतिहासाचा विपर्यास केल्यामुळे महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, शहा आणि भाजपचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. इतिहास संशोधकांनी शहांच्या विधानाचा निषेध करीत तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  आज सांगली जिह्यातील बत्तीस शिराळा येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहांची सभा पार पडली. यावेळी भाषणात अमित शहा म्हणाले, ‘समर्थ रामदासांचे पाऊल जिथे पडले ती ही पवित्र भूमी आहे. रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे कार्य केले’ इतिहासाशी छेडछाड करणाऱ्या अमित शहांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

दादा गटानेही फटकारले

अमित शहांच्या वक्तव्यावरून महायुतीतील अजित पवार गटानेही फटकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अमित शहांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहून दिली हे शोधलं पाहिजे. बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय बोलू नये असे अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’द्वारे म्हटले आहे.

शिराळ्याची सभा ठरली ‘फ्लॉप शो’

शिराळा येथील गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचा मोठा गाजावाजा भाजप महायुतीने केला होता. परंतु ही सभा फ्लॉप शो ठरली. शिराळा आणि सांगली जिल्हय़ातील नागरिकांनी सभेकडे पाठ फिरवली. मैदान ओस पडले होते. खुर्च्या रिकाम्या होत्या. यामुळे भाजप नेते हादरले आहेत.

हे पटणारे नाहीसंभाजीराजेंनी सुनावले

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांना तुम्ही जर जोडलं किंबहुना आणि कोणी त्यांना गुरु म्हणत आहेत तसं होऊ शकत नाही. शिवाजी महाराज यांचे एकच गुरु ते आहेत. जिजाऊ माँसाहेब म्हणून त्यांचं महत्त्व आहे त्या ठिकाणी असावं. त्यांच्या महत्त्वाला आम्ही चॅलेंज करत नाही, पण शिवाजी महाराज यांना जोडायचं हे न पटणारं आहे.

ही तर भाकडकथाइंद्रजित संतापले

शिवरायांनी जिजाऊ व शहाजीराजांकडून प्रेरणा घेत स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. 1642 ते 1672 या कालावधीत शिवरायांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदासांचे नाव कागदपत्रांमध्ये कुठेही नोंदवलेलं नाही. रामदासांनी तरुणांना शिवरायांना पाठिंबा द्यायला सांगितले ही भाकडकथा आहे. शहांच्या विधानामागे भाजप व संघाची व्यूहरचना आहे, असा आरोप इंद्रजित सावंत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास जाणवतात ही लक्षणे, दुर्लक्ष करु नका व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास जाणवतात ही लक्षणे, दुर्लक्ष करु नका
शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. मात्र, आजकाल खाण्यापिण्याच्या...
लहान मुलांना दुधाच्या बॉटलने दूध पाजताय तर सावधान, हिवाळ्यात घ्या विशेष काळजी
रत्नागिरीत हातखंबा नाक्यावर 35 लाखांचे सोने पकडले; ‘एसएसटी’ पथकाची कारवाई
हातात मशाल घेतलेली जनता रावणाची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विश्वास
रत्नागिरीत 13 बांग्लादेशी नागरिकांना पकडले
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 942 जणांचे टपाली मतदान
उद्योगपतींना 16 लाख कोटींची कर्जमाफी देणाऱ्या नरेंद्र मोदींनी एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?: राहुल गांधी